Share

अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक तालुका सात दिवस लॉकडाऊन !

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, अकोले ह्या तालुक्यात यापूर्वीच लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. आता श्रीगोंदा शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांनी एकत्र बैठक घेत श्रीगोंदा तालुक्यासाठी सात दिवसांचा जनता कर्फ्यू (बंद) पुकारला असून या जनता कर्फ्यूसाठी श्रीगोंदा तालुका व्यापारी असोसिएशनच्या वतीने सहकार्य करण्यात येणार असून सर्व नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी यामध्ये सहभागी होवून बंद यशस्वी करावा, असे आवाहन माजी मंत्री व आमदार बबनराव पाचपुते यांनी केले आहे.

मागील अनेक दिवसांपासून श्रीगोंदा तालुक्यामध्ये कोरोनाचा विळखा वाढतच चालला आहे. या रोगामुळे आत्तापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला असल्याने श्रीगोंदा तालुक्यातील नेतेमंडळी, व्यापारी व नागरिकांनी एकत्र येत बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सोमवार दि. १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या कालावधीमध्ये लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या बैठकीसाठी आमदार बबनराव पाचपुते, माजी जि.प.अध्यक्ष बाबासाहेब भोस, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, युवा नेते मंगेश डोके, अप्पर तहसिलदार चारुशीला पवार, नायब तहसिलदार डॉ.योगिता ढोले, आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर, प्रा.तुकाराम दरेकर, व्यापारी असोसिएशनचे सतीश पोखर्णा, गौरव बोरा, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!