Share

चिल्लर भुरटे आणि त्यांच्या सूत्रधारांसमोर झुकणार नाही : अतुल भातखळकरांचा शिवसेनेवर घणाघात

Published On: 

मुंबई : माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी शारिरीक इजा केल्याची धक्का दायक घटना उघडकीस आली आहे. यानंतर अधिकाऱ्याला शारिरीक इजा करणाऱ्या शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. यामध्ये शिवसेना शाखाप्रमुख कमलेश कदम याच्यासह 6 जणांचा समावेश आहे.या शिवसैनिकांना जामीन मिळाल्याचे वृत्त आता समोर येत आहे.

यानंतर आता भाजप या मुद्द्यावरून आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. शिवसैनिकांवर योग्य गुन्हे दाखल न केल्याने त्यांना जामीन मंजूर झाला असून ते आता मोकाट फिरत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लावला. तर, आरोपींवर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत पोलीस सहआयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. यानंतर पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.

कंदिवली पूर्वचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी आंदोलनाचे काही फोटो ट्विटरवर शेअर करत हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना चिल्लर, भुरटे संबोधत टीका केली आहे. ” महिला आणि वृद्धाना ताकद दाखवणारे चिल्लर भुरटे आणि त्यांच्या सुत्रधारांसमोर झुकणार नाही, पळणार नाही, आम्ही लढणार, आम्ही जिंकणार…” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!