🕒 1 min read
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र येण्याबाबत नेहमीच चर्चा होते. राज ठाकरे यांना आज या प्रश्नावर पुन्हा डिवचण्यात आलं. यावेळी त्यांनी दोनच शब्दात पण मिश्किल उत्तर दिलं. त्यामुळे राज आणि उद्धव एकत्र येणार का? याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का? हा प्रश्न सर्वांच्या भावनिक जिव्हाळ्याचा होऊन बसला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज एका वेबिनारमध्ये हाच प्रश्न पुन्हा एकदा विचारण्यात आला असता त्यांनी अगदी दोनच शब्दांत मार्मिक उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का? असं विचारलं असता राज ठाकरे यांनी ‘परमेश्वरास ठाऊक’ अशा दोनच शब्दांत उत्तर दिलं. आत्ता सध्याचा काळ पाहता या प्रश्नांची उत्तरं नाहीत. इतर कुणाकडेही असतील असं वाटत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.
परमेश्वरावर तुमचा विश्वास आहे का? असं विचारण्यात आलं असता ‘हो, नक्कीच आहे. म्हणूनच मी हात वर केले, असंही राज ठाकरे म्हणाले. ‘सध्या कोरोनामुळे नेमकं काय चाललंय काहीच कळत नाही. तुमच्या हातात काहीच नाही. आता दुसरी लाट येऊन गेली. मग पुन्हा तिसरी येईल असं सांगतायत. मग पुन्हा लॉकडाऊन केलं जाईल यामुळे काहीच ठोस तुम्ही सांगू शकत नाही. कोरोनाच्या संकटातून समाज बाहेर यावा, बाकीच्या गोष्टी होत राहतील’, असं राज ठाकरे म्हणाले. ते आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलत होते.
महत्त्वाच्या बातम्या
- एका आठवड्यात ब्लॅक फंगसचं औषध घेऊन येत आहोत, बाबा रामदेवांची सिंहगर्जना
- पुन्हा अशीच गर्दी होत राहिल्यास निर्बंध अधिक कठोर केले जातील; मुख्यमंत्र्यांचा इशारा
- मराठा समाजाने राज्यसरकारने जाहीर केलेल्या EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा – मलिक
- ‘आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायची झाली तरी हे केंद्राला सांगतील’
- २० वर्षांनी थिरकले गोविंदा- नीलम `या` गाण्यावर, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
