नवी दिल्ली- देशभरात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून कोरोनासोबातच आता ब्लॅक फंगसचे देखील रुग्ण वाढत चालले आहेत. ब्लॅक फंगसमुळे देखील अनेकांची डोकेदुखी वाढली असताना योग गुरू स्वामी रामदेव यांनी एक सिंहगर्जना केली आहे.
आपण लवकरच ब्लॅक फंगसवरील औषध घेऊन येत आहोत, असा दावा स्वामी रामदेव यांनी केला आहे. ”अनेक प्रकारचे वाद उद्भवले असले तरी, मी 18 तास सेवाकार्य करतच आहे आणि एका आठवड्याच्या आत ब्लॅक फंगस, येलो फंगस आणि व्हाइट फंगसवरील इलाज आयुर्वेदाच्या माध्यमाने देणार आहे. काम झाले आहे आणि प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे,” असे स्वामी रामदेव यांनी म्हणाले.
एवढेच नाही, तर ”आयएमए ना कुठली साइंटिफिक व्हॅलिडेशनची बॉडी आहे, ना त्यांच्याकडे कुठली लॅब आहे, ना त्यांच्याकडे कुणी वैज्ञानिक आहेत. आयएमए एक एनजीओ आहे,” असेही रामदेव यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रामदेव हे विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. कोरोना लसीकरण आणि अॅलोपॅथीसंदर्भात बाबा रामदेव यांनी केलेल्या वक्तव्यावरून काहीअंशी नाराजी देखील व्यक्त केली जात आहे. अटकेच्या बाबत केलेल्या वक्तव्यामुळे देखील बाबांवर मोठी टीका झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची तब्येत बिघडली, बारावीच्या परीक्षेचा चेंडू आता मोदींच्या दालनात ?
- पुन्हा अशीच गर्दी होत राहिल्यास निर्बंध अधिक कठोर केले जातील; मुख्यमंत्र्यांचा इशारा
- मराठा समाजाने राज्यसरकारने जाहीर केलेल्या EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा – मलिक
- ‘आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायची झाली तरी हे केंद्राला सांगतील’
- २० वर्षांनी थिरकले गोविंदा- नीलम `या` गाण्यावर, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल


