Share

२० वर्षांनी थिरकले गोविंदा- नीलम `या` गाण्यावर, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: छोट्या पडद्यावरील डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर ४’ प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांनी त्यांच्या डान्सने  अनेकांची मने जिंकली आहेत. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज पाहुणे कलाकार हजेरी लावतात. नुकताच या कार्यक्रमात अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री नीलम कोठारी यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे त्यांनी ‘आप के आ जाने से’ गाण्यावर डान्स केला आहे.

गोविंदा आणि नीलम यांची जोडी एकेकाळी सुपरहिट होती. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना पाहायला आवडत होती. आता दोघांनी एकत्र ‘सुपर डान्सर ४’ या कार्यक्रमात हजेरी लावली. जवळपास २० वर्षांनंतर त्यांनी सुपरहिट गाणे ‘आप के आ जाने से’वर डान्स केला आहे. त्यांचा डान्स पाहून कार्यक्रमाचे परिक्षक शिल्पा शेट्टी, अनुराग बासू, गीता कपूर हे आनंदी झाल्याचे पाहायला मिळते.

https://www.instagram.com/p/CPhvRZklZ3F/?utm_source=ig_web_copy_link

नीलम कोठारी यांचे पती समीर सोनी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नीलम आणि गोविंदाचा हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘आणि २० वर्षांची प्रतिक्षा संपली’. गोविंदा आणि नीलम यांचा डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेक प्रतिक्रिया यावर येत आहे. ८०-९०च्या दशकात नीलम आणि गोविंदाने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. आता त्यांना जवळपास २० वर्षांनंतर एकत्र पाहून त्यांचा चाहता वर्ग आनंदी झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!