परभणी : पूर्णा तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता पुर्णामध्ये लवकरच ऑक्सिजन असलेल्या बेडची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी सांगितले. दिवसेंदिवस पूर्णा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात करोणा रूग्णांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
परभणी जिल्ह्याभरात कोरोना रुग्णांची संख्या ही फेब्रुवारी महिन्यामध्ये हळुहळु वाढायला लागली. तर ती एप्रीलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण खुप वाढत आहेत. तसेच ग्रामीण भागामध्ये कोव्हिड सेंटर्स नसल्याने तेथील रुग्ण हे परभणी शहरामध्ये कोरोनावर उपचार करण्यासाठी दररोज खुप मोठ्या संख्येने रुग्ण येत आहेत. त्यामुळे शहरातील खासगी तसेच सरकारी कोव्हिड सेंटरवर कोरोना रुग्णांवर उपचारासाठी लागणारे डॉक्टर्स , नर्स तसेच इतर मनुष्यबळ देखील कमी पडत आहेत.
त्यामुळे आता कोरोना रुग्णांच्या वाढीचा आकडा लक्षात घेता आता सर्व ग्रामीण तसेच तालुका पातळीवरील कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था आता ग्रामीण भागात देखील महत्वाची झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर पूर्णा शहरातील रेल्वेस्थानक परीसरात रेल्वेमध्ये नवीन कोविड सेंटर सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे खासदार संजय जाधव यांनी या वेळी सांगितले. लवकरात लवकर पुर्णेमध्ये ५० बेडचे कोविड सेंटर उभारले जाणार आहे. या सेंटरवर लवकरच रुग्णांना आवश्यक असलेली ऑक्सिजनच्या बेडची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे खासदार जाधव यांनी सांगितले.
- तुमच्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का? ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ करा आणि रहा बिनधास्त
- रविवारी ‘इतके’ लोक विनाकारण निघाले घराबाहेर! त्यातून सहा पॉझिटिव्ह
- कोरोनाची परिस्थिती बिकट, तातडीने अधिवेशन बोलवा : चंद्रकांत पाटील
- परभणी जिल्ह्यात तालुकास्तरावर ५० बेडचे कोविड सेंटरची उभारणी करा : आ. लोणीकर
- महापालिका मिशन ‘मोड’वर! आजपासून व्यापारी, बँक कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरु
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

