🕒 1 min read
मुंबई : खामोश.. म्हणतं आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारे शत्रुघ्न सिन्हा सर्व परिचित आहेत. मात्र त्यांच्या बद्दल आणखी एक मजेदार घटना घडली, ज्याच्या आठवणीमुळै आज ही शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम चंडीरमानी दोघांना हसू आवरत नाही.
सुमारे पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम चंडीरमानी या दोघांनी १९८० मध्ये लग्न केले. बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी ७० ते ८० चे दशक गाजवले आहे. शत्रुघ्न हे फक्त त्यांच्या अभिनयासाठीच नाही तर उशिरा येणाच्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असायचे. शत्रुघ्य यांना कोणत्याही ठिकाणी उशिरा जाण्याची सवय होती की ते स्वत: च्या लग्नाला ३ तास उशिरा पोहोचले होते. एका कार्यक्रमात त्यांनी हा खुलासा केला आहे.
दरम्यान शत्रुघ्न यांनी या विषयी त्यांच्या लग्नाबद्दल आठवणी ताज्या करतांना सांगितले. शत्रुघ्न चित्रपटाच्या सेटवर नेहमीच उशिरा पोहोचायचे ते कधी वेळेत पोहोलचे नाही. ‘मी माझ्या स्वत: च्या लग्नात तब्बल तीन तास उशिरा पोहोचलो होतो’ असे शत्रुघ्न म्हणाले. सेटवर उशिरा येण्याचा किस्सा सांगत शत्रुघ्न म्हणाले, ‘मी सेटवर खूप उशिरा पोहोचायचो. पण मला सगळी काम वेळेत संपवण्यासाठी ही ओळखले जाते. सेटवर उशिरा पोहोचत असलो तरी मी वेळेच्या आधीच काम पूर्ण करायचोय.’शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले, ‘मी कधीही कुणाला त्रास दिला नाही किंवा नखरे दाखवले नाही. मात्र जे कलाकार वेळेवर सेटवर पोहोचतात त्यांची स्तुती केली आहे. त्यांच्या या आठवणीं सांगीतल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात घटना घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखविणे, ही असंवेदनशीलता : देवेंद्र फडणवीस
- ‘राज्यात काय चाललयं याचा थांगपत्ता नाही’; आरोह वेलणकरचा मविआ सरकारवर निशाणा
- कोयना धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
- ‘काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा आणि निष्ठा असणारे नेतृत्व गमावले’
- पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार जो बायडन यांची भेट; संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेलाही संबोधित करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
