नागपूर : काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांच्यासह 23 वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष बदलविण्यासंदर्भात हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींना पत्र लिहिले. पुढे हा मुद्दा राष्ट्रीय झाला. या पत्रावरून बरेच वादंग निर्माण झाले असून, जिल्ह्यात वासनिकांविरोधात रोष आहे. त्यामुळे वासनिकांचे असंख्य निष्ठावंत कार्यकर्ते त्यांची साथ सोडणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून वाद सुरू आहेत. काँग्रेसचा अध्यक्ष बदला अशी मागणी मुकुल वासनिक यांच्यासह 23 वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आली होती. याचे पत्र कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवण्यात आले होते. यानंतर महाराष्ट्राचे दुग्धविकासमंत्री व काँग्रेस नेते सुनील केदार यांनी वरिष्ठ नेत्यांवर टीका केली होती. सुनील केदार यांनी ‘मी जे आहे ते ठामपणे मांडतो. माझ्यावर कारवाई झाली तरी चालेल’, असे मत व्यक्त केले होते. पक्ष सोनिया गांधी यांच्या पाठिशी आहे. मात्र, गांधी कुटुंबाच्या कामावर मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी प्रश्न उपस्थित करणे ही लाजिरवाणी आहे. या नेत्यांनी त्यांनी केलेल्या कृत्याबाबत तातडीने माफी मागावी, असे झाले नाही तर काँग्रेस कार्यकर्ते त्यांना राज्यात कुठेही फिरकू देणार नाही, असा इशाराही केदार यांनी ट्विट करून दिला आहे.
वासनिक यांनी माफीच मागावी काँग्रेसने मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, मिलींद देवरा यांच्यासह इतरांनाही मोठे केले. गांधी कुटुंबीयांवर निष्ठा दाखविण्याऐवजी अध्यक्ष बदलविण्याची मागणी करणे योग्य नाही. वासनिकांसह इतरही नेत्यांनी माफी मागावी, अशी मागणी जिपचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी केली.
५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देणारं महाराष्ट्र एकटं राज्य नाही; कपिल सिब्बलांनी केली ‘ही’ मागणी
मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नाही ; विनायक मेटेंचा घणाघात
विनायक मेटेंच्या आरोपांवर मंत्री बाळासाहेब थोरातांनी दिले प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

