Share

विनायक मेटेंच्या आरोपांवर मंत्री बाळासाहेब थोरातांनी दिले प्रत्युत्तर

Published On: 

मुंबई : मराठा आरक्षणाच्या याचिकांची सुनावणी घटनात्मक खंडपीठापुढे करण्यात यावी यासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात निर्णय होणे अपेक्षित होते. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात आभासी कोर्टामध्ये सुनावणी सुरू असून याचिकाकर्त्यांनी आरक्षणाची सुनावणी घटनात्मक खंडपीठापुढे करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

त्यामुळे मराठा आरक्षणाची सुनावणी मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही याकडे सर्वांच लक्ष लागलं होत. मात्र आता, मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी शुक्रवारी (दि. २८ ऑगस्ट) रोजी होणार आहे.

मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नाही ; विनायक मेटेंचा घणाघात

आजच्या सुनावणीवरून शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी, महाराष्ट्र सरकारच्या वकीलांमध्येच समन्वय पाहायला मिळत नसून मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकार अजूनही गंभीर नाही असा आरोप त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावरून अशोक चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक बोलवावी अशी मागणी केली आहे. तसेच, शरद पवारांनी मनावर घेतलं असतं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न केव्हाच मार्गी लागला असता असं मतही व्यक्त केलं आहे.

५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देणारं महाराष्ट्र एकटं राज्य नाही; कपिल सिब्बलांनी केली ‘ही’ मागणी

विनायक मेटे यांनी केलेल्या या आरोपांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे जे काही करणं आवश्यक आहे ते सरकार करतं आहे असं प्रत्युत्तर थोरात यांनी दिलं आहे. आम्ही सगळ्या मराठा संघटनांशी, वकीलांशी चर्चा करत आहोत. मराठा आरक्षणाबाबत काही जणांनी राजकारण सुरु केलं आहे. हा विषय राजकारणाच्या पलीकडे असला पाहिजे. पण जण राजकीय मतलब साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप देखील थोरात यांनी केला आहे. यासंदर्भात न्यूज १८ लोकमतने वृत्त दिले आहे.

धुळे पोलिसांच्या गुंडागर्दीचा निषेध करावा तितका कमीच ; भाजपा आमदार राम सातपुतेंनी केली कारवाईची मागणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!