🕒 1 min read
लातूर: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात तसेच ग्रामीण भागात देखील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकंदरीतच जिल्ह्याची स्थिती चिंताजनक होत चालली आहे. अशातच लसीकरणाचा देखील मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झालेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेने कोरोना प्रतिबंधक लसीची खरेदी करून नागरिकांचे लसीकरण करावे, अशी मागणी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे केली आहे.
लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने नागरिकांत गोंधळ निर्माण झाला आहे. महाराष्ट्र सरकार लस खरेदी करण्याच्या तयारीत आहे. मात्र जोपर्यंत प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत लाभार्थी नागरिक लसीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडून लसीचा सुरळीत पुरवठा केला जात नाही, तोपर्यंत लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना सरसकट लस देण्यासाठी मनपाने लसीची खरेदी करून लसीकरण करावे. जेणेकरून परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही. तसेच लातूर शहर मनपा हद्दीतील नागरिकांचे आरोग्यही चांगले राहील, असे उपमहापौर बिराजदार यांनी म्हटले आहे.
राज्य शासनाने येत्या १ मेपासून १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांना मोफत लसीकरण करण्याचे घोषित केले आहे. मात्र, केंद्र व राज्याकडून अद्याप पुरेशा प्रमाणात लसीची उपलब्धी होण्यास उशीर होण्याची शक्यता दिसून येत आहे. या वयोगटातील व्यक्तींना ऑनलाईन नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. नोंदणीनंतर ही मंडळी लसीकरण केंद्रावर गेल्यास तेथे अनावश्यक गर्दी वाढण्याची शक्यता आहे. तसे झाले तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी तो वाढण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे शासन-प्रशासनाने याबाबत समन्वय साधून अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता बाळगणे गरजेचे आहे, असेही उपमहापौर बिराजदार यांनी निवेदनात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘रोहित सरदाना खोटारडा होता, तो आठवणीत राहणार नाही’, शरजील उस्मानीचे वादग्रस्त ट्विट
- राज्यात वजनदार नेते आपल्या भागात रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरवठा खेचून नेतायत; फडणवीसांचा आरोप‘
- हळहळ! कारच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू, पती गंभीर
- हिंगोली जिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर्ससाठी एक कोटी रुपयांचा निधी
- कमी स्कोअर असलेल्या रुग्णांना रेमेडेसिवीर नाही; लातूरमधील रुग्णांचे नातेवाईक सापडतायत कोंडीत

