Share

कमी स्कोअर असलेल्या रुग्णांना रेमेडेसिवीर नाही; लातूरमधील रुग्णांचे नातेवाईक सापडतायत कोंडीत

Published On: 

लातूर: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे तसेच येथील ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब ठरत आहे. रुग्णांची संख्या जास्त आणि रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या कमी असे चित्र सध्या बघायला मिळत आहे. तसेच रेमेडेसिवीर इंजेक्शनचा देखील तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ज्या रुग्णांचा स्कोअर कमी असेल अशा रुग्णांना रेमेडेसिवीर इंजेक्शनची गरज नाही असे सांगण्यात येत आहे. मात्र लवकर बरे होण्यासाठी डॉक्टर रेमेडेसिवीर इंजेक्शन सांगत आहेत मात्र तेही तोंडी आणि मेडिकल चालक प्रिस्क्रिप्शनशिवाय इंजेक्शन देत नाहीत. अशा परिस्थितीत करायचे काय, असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांना पडत आहे.

ऑक्सिजन लेवल कमी व हाय स्कोअर असणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांनाच रेमडेसिवीर इंजेक्शन द्या आणि रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरुन रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्याची प्री्क्रिरप्शन देऊ नका, असे जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत. त्यामुळे अनेक डॉक्टर ८ ते १० व १२ पर्यंत स्कोअरच्या रुग्णांना लवकर बरे करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्यास नातेवाईकांना तोंडी सांगत आहेत. तर दुसरीकडे औषधी विक्रेता प्री्क्रिरप्शनशिवाय इंजेक्शन देत नाही. अशा कोंडीत सापडलेले नातवाईक इंजेक्शन मिळत नसल्याने हतबल होत आहेत.

जिल्ह्यात आजघडीला ७५ कोविड हॉस्पिटल्समधील आयसीयूमध्ये २ हजारांवर कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत. तर हजारावर रुग्णांची ऑक्सिजन लेवल कमी असल्याचे सांगितले जाते. या आजारावर फलदायी ठरणारे रेमडेसिवीर इंजेक्शन आहे. या इंजेक्शनची उत्पादकता कमी असल्याने तुटवडा आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गरज असलेल्या रुग्णालाच रेमडेसिवीरचे इंजेक्शन द्यावे व रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन बाहेरुन आणण्यासाठी प्री्क्रिरप्शन देऊ नका, असे आदेशित केले आहे. त्यामुळे ८-९ एवढ्या कमी स्कोअर असलेल्या रुग्णांना प्री्क्रिरप्शन देता येत नाही. मात्र अनेक डॉक्टर रुग्ण लवकर बरा व्हावा म्हणून रेमडेसिवीर इंजेक्शन बाहेरुन आणण्यास सांगत आहेत. प्रशासनाच्या आदेशामुळे प्री्क्रिरप्शन मिळत नाही. त्यामुळे नातेवाईकांची मोठी गोची झाली आहे. कारण प्री्क्रिरप्शनशिवाय खाजगी औधषी विक्रेता इंजेक्शन देणार नाही. त्यामुळे इंजेक्शन आणायचे कोठून? असा प्रश्न नातेवाईकांना पडला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!