Share

हिंगोली जिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर्ससाठी एक कोटी रुपयांचा निधी

Published On: 

हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयाला कोरोना बाधीत रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी ऑक्सिजन काँन्सन्ट्रेटर्ससाठी आमदार तानाजी मुटकुळे यांनी आपल्या स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गंत एक कोटी रुपयांचे निधी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.

शहरासह जिल्हाभरामध्ये कोराेना रुग्णांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना खुप मोठ्या प्रमाणात  ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यामुळे ऑक्सिजनसाठी नातेवाईकांसह आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांची धावपळ करावी लागत आहे. दरम्यान शहरासह ग्रामीण भागामधील गंभीर रुग्ण खुप मोठ्या प्रमाणात उपचारासाठी दाखल होत आहेत. दाखल केलेल्या गंभीर रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यासाठी ऑक्सिजनची गरज खुप मोठ्या प्रमाणात भासत आहे.

त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णांलयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पुरवण्यासाठी आमदार तानाजी मुटकुळे यांनी स्वत:च्या स्थानिक आमदार निधीमधून २०२१ – २२ मधून १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना तसे पत्र देखील लिहिले आहे. आता या माध्यमातून दवाखान्याला १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे रुग्णांना तर खुप दिलासा मिळणार आहे. आमदार मुटकुळे यांनी सेनगाव तालुक्यातील कवठा, हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयाला भेट देखील दिली. या वेळी पत्रकारांना बोलताना आमदार मुटकुळे म्हणाले की, रेमिडिसिविर भेटत नसल्याच्या तक्रारी तर शहरीभागासह ग्रामीण भागातून देखील येत आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी देखील यावेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या      

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!