औरंगाबाद : टीव्ही सेंटर रोडवरील सिद्धार्थ नगर जवळ भरधाव कार चालकाने दुचाकीला धडक दिली. धडक इतकी भयानक होती की कार चालकाने दुचाकीला जवळपास दोनशे फूट फरफटत नेले. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. तर महिलेचा पती गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
याबाबतची माहिती अशी की, मयूर नगर पाटणी रेसिडेन्सी येथे राहणारे प्रकाश शेळके (४५) व त्यांची पत्नी सुनिता प्रकाश शेळके (४२) हे दोघेजण गुरुवारी रात्री आपल्या स्कूटी वरून घराकडे जात होते. त्यावेळेस समोरुन राँग साईडने भरधाव आलेल्या (कार क्रमांक एमएचट्वेंटी डीजे ४०४४) चालकाने शेळके यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर स्कुटीला जवळपास दोनशे फूट फरफटत नेले. त्यात प्रकाश शेळके व त्यांच्या पत्नी सुनिता शेळके हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच सिटी चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंधारे हे घटनास्थळी दाखल झाले. जमा झालेल्या संतप्त जमावाने कारमध्ये बसलेल्या युवकांना चांगलाच चोप दिला. पण पोलीस योग्य वेळी घटनास्थळी पोहोचल्याने पोलिसांनी जमावाला पांगवले व कार चालक आणि युवकांना ताब्यात घेतले.
खाजगी रुग्णालयात कडून उपचारास नकार
टीव्ही सेंटर येथे अपघात झाल्यानंतर काही युवकांनी जखमींना तात्काळ जवळ असलेल्या हॉस्पिटलमध्ये नेले. पण तेथे डॉक्टरांनी प्रथमोपचार न करता दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर तरुणांनी दुसऱ्या सिद्धिविनायक हॉस्पिटल मध्ये जखमी व्यक्तींना नेले. रुग्णालयातील डॉक्टरांनी दाखल करून घेतले नाही शेवटी शेळके दाम्पत्य यांना घाटीत नेण्यात आले. त्यावेञयळी सुनिता शेळके यांचे निधन झाले. सिद्धिविनायक रुग्णालयाच्या डॉक्टरांनी वेळीच उपचार केले असते तर सुनीता शेळके यांचे प्राण वाचले असते. शेळके यांच्या नातेवाइकांनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लसींच्या साठ्याबाबत आरोग्यमंत्र्यांची भूमिका बरोबरच आहे – देवेंद्र फडणवीस
- हृदयद्रावक! मुलाच्या निधनाची बातमी ऐकताच आई वडिलांनी सोडला प्राण
- बीडच्या पाडळी येथे लोकसहभागातून विलगीकरण केंद्र सुरु
- शिवसेनेला जमले नाही ते राष्ट्रवादीने करून दाखवले!
- ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव; गेवराई तालुक्यात रुग्णांच्या संख्येत वाढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

