Share

कंगना रणौत-शिवसेना वाद शमणार? राऊत म्हणाले…

Published On: 

मुंबई : गेले ३ दिवस अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पोलिसांसह मुंबई शहरावर केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. तर कंगना देखील आपल्या मतावर ठाम असून निकामी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केल्याने या वादाला वेगळे वळण दिले जात आहे, अशी भूमिका तिने मांडली होती.

काय आहे हे प्रकरण?

अभिनेत्री कंगना रणौत हिने अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलिसांवरच संशय घेत आरोप केले . तर, “मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते अशा आशयाचे ट्विट केले होते. दरम्यान, मला मुंबईत न येण्याची धमकी दिली जात आहे. मुंबईत असुरक्षित वाटत असून मुंबई आता पाकव्याप्त काश्मिरसारखी झाली आहे,” असे ट्विट अभिनेत्री कंगनाने केल्यानंतर आता तिला चांगलेच लक्ष्य केले जात आहे.

..तर जम्बो रुग्णालयाचे काम दुसऱ्यांना द्या ; अजित पवारांनी सुनावले

कंगनाच्या या वक्तव्यावर मराठी चित्रपटसृष्टीसह राज्यातील सामान्य नागरिक देखील संताप व्यक्त करत असून अनेक राजकीय नेत्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. काही ठिकाणी तर तिच्या पोस्टरला काळे फासत चपलांच्या जोड्याने फटके दिले गेले. दुसरीकडे शिवसेनेने कंगनाला मुंबईमध्ये पाऊल ठेऊ देणार नाही अशी भूमिका घेतली.यानंतर, शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना रणौतमध्ये शाब्दिक वाद चांगलाच वाढला, तो अगदी बाप निघेपर्यंत पोहोचला होता.

श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना कोरोनाची लागण!

आता संजय राऊत यांनी काय भूमिका घेतली आहे?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना कंगना राणावतला महाराष्ट्राची माफी मागावी असे मागणी केली आहे. जर कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर माफ करण्याबद्दल विचार करू, असं राऊत म्हणाले. तसंच, कंगनाने मुंबईबद्दल वक्तव्य करण्याची हिंमत केली. हेच तिने अहमदाबादबद्दल बोलून दाखवावे, असं आव्हानही राऊत यांनी कंगनाला दिले आहे.

भाजपा ही मेलेल्यांंच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात: काँग्रेस

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!