Share

श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना कोरोनाची लागण!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यातील जवळपास २५ हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. आता श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना त्रास होत असल्याने त्यांनी काल कोरोनाची चाचणी केली असता त्यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कांबळे यांना त्रास होत असल्याने त्यांनी सुरुवातीला फॅमिली डॉक्टरांकडून औषधोपचार घेतला. परंतु  प्रकृतीत कुठलीही सुधारणा होत नसल्याने त्यांनी अखेर काल ग्रामीण रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी केली. त्यात यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ते संत लुक रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

भाजपा ही मेलेल्यांंच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात: काँग्रेस

खबरदारी म्हणून कांबळे यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा मंदा कांबळे, त्यांचे चिरंजीव नगरसेवक संतोष कांबळे, संदीप कांबळे यांचीही कोरोनाची चाचणी करण्यात आली. परंतु ते सर्व जण निगेटिव्ह आले आहेत. यापूर्वी श्रीरामपूरचे विद्यमान आमदार लहू कानडे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे कोरोना बाधीत झाल्याचे समजताच त्यांचे कार्यकर्ते, समर्थक व मित्र मंडळींना धक्का बसला आहे.

अहमदनगरच्या शिक्षकाने गाजवली दिल्ली; नारायण मंगलाराम यांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!