Share

..तर जम्बो रुग्णालयाचे काम दुसऱ्यांना द्या ; अजित पवारांनी सुनावले

Published On: 

पुणे : गेले पाच महिने पुण्यासह राज्यभरात कोरोनाने हाहाकार घातला आहे. पुण्यातील जनजीवन एकबाजूला सुरळीत होत असतानाच कोरोनाच्या थैमानाचे व प्रशासनाचे व्यवस्थेचे वाभाडे निघालेले दिसून येत आहेत. पुण्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड्स उपलब्ध नाहीत. कोट्यवधी खर्चून जम्बो रुग्णालये उभारली पण आवश्यक सोयी-सुविधा नसल्याने रोज अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत.

काही दिवसांपूर्वी पत्रकार पांडुरंग रायकर यांचे निधन झाल्यामुळे पुणे शहरातील आरोग्य व्यवस्थेमध्ये असलेल्या उणीवा समोर आल्या आहेत. यानंतर राज्य सरकार, महापालिका प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली जात असून, राजकीय नेत्यांनी देखील आता त्वरित हालचाली सुरु केल्याचे दिसून येत आहे.

भाजपा ही मेलेल्यांंच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात: काँग्रेस

तर, जम्बो रुग्णालयातील एकूण  १२० डॉक्टरांनी व कर्मचाऱ्यांनी  आपले राजीनामे दिले आहेत. आवश्यक औषधे, साहित्य व सोयी नसल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहे. त्यामुळे, पुण्यातील COEP कॉलेज ग्राउंड येथे उभारलेल्या जम्बो कोव्हिड रुग्णालय हे रुग्णांना बचवण्यासाठी आहे कि प्राण घेण्यासाठी असा सवाल उपस्थित होत आहे.

अहमदनगरच्या शिक्षकाने गाजवली दिल्ली; नारायण मंगलाराम यांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव

दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल पार पडलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांसह प्रशासनाला चांगलेच सुनावले आहे. लाईफलाईन या आरोग्य विषयक संस्थेला कंत्राट देण्यात आले आहे. जर लाईफलाईन संस्थेला सेंटर चालवणे जमत नसेल तर दुसरी एजन्सी नियुक्ती करा असे आदेश प्रशासनाला त्यांनी दिले आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना मातृशोक

काल, पुण्यातील सर्व राजकीय नेत्यांची, खासदार आमदारांसह अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्य मंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे.

केंद्रीय उच्चपदस्थ अधिकारी डॉ. सुजितकुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!