मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंहचे प्रकरण सध्या देशात खूप गाजत आहे. यावरून राजकारणही मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे. आगामी बिहार निवडणूकीत हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे कारण, भारतीय जनता पार्टी आर्ट कल्चर सेलचे बिहार संयोजक वरुणकुमार सिंह यांनी सुशांतचा फोटो असलेले एक स्टिकर छापले आहे.
अहमदनगरच्या शिक्षकाने गाजवली दिल्ली; नारायण मंगलाराम यांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव
या स्टिकरवर ‘ना भूले है ना भूलने देंगे’ असं लिहिले आहे. आता यावरून राजकारण तापले आहे. आणि दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांना लक्ष्य करणं सुरू केलं आहे. सुशांतसिंग प्रकरणावरुन भाजपची भूमिका सुरुवातीपासूनच आक्रमक राहीली आहे, सिबीआय चौकशीची मागणी सुद्धा भाजपनेच केली होती. याप्रकरणी सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप अभियान सुरू करणार आहे अस त्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना मातृशोक
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत सुशांंत प्रकरणाचा फायदा भाजप उठवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यातच महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपा ही मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात आहे असा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.
#भाजपा ही मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारी जमात आहे यात शंका नाही! pic.twitter.com/OpyPoQJoMT
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 5, 2020
आता यावरून राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. सुशांत प्रकरण निपक्षपातीपणाने हाताळलं जावं अशी भाजपची ईच्छा होती,आता सिबीआय या प्रकरणी तपास करत आहे त्यामुळे याला निवडणूकीत मुद्दा बनवण्याला अर्थ काय असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजल जयस्वाल यांनी केला आहे.आता सुशांत प्रकरणाला दररोज वेगवेगळ्या पद्धतीने वळण मिळत असून हा राजकीय आखाडा बनत चाललं असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
बिहारमध्ये राजकीय भूकंप, लालूंच्या पक्षाच्या 12 आमदारांचे राजीनामे…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

