Share

अडवाणींच्या नावे खोटे ट्विट करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करणार; केशव उपाध्ये यांची माहिती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – माजी उपपंतप्रधान व भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाने बनावट ट्विट करणाऱ्या संबंधितांविरुद्ध रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यानिमित्ताने भाजपा विरोधकांच्या वैफल्याचे दर्शन झाले आहे, असेही  उपाध्ये यांनी म्हटले आहे.

उपाध्ये यांनी पत्रकात म्हटले आहे की, ज्येष्ठ नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाने बुधवारी एक ट्विट प्रसिद्ध झाले होते. मात्र ज्या ‘@LK_Adwani’ हॅन्डल वरून हे ट्विट करण्यात आले आहे, ते हॅन्डल मा. अडवाणी यांचे नाही, असे प्रसारमाध्यमांना आढळून आले.

दरम्यान, अडवाणी यांचे ट्विटरवर अकाऊंटच नसल्याचा खुलासा अडवाणी यांचे स्वीय सहाय्यक दीपक चोप्रा यांनी केला आहे.असे खोटे ट्विट करून सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्यांचे भांडे फुटले आहे. या ट्विट मागे असणाऱ्या मंडळींचा शोध घ्या व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशी मागणी  उपाध्ये यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!