टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर कॉंग्रेस पक्षाकडून सत्ताधारी भाजपला सत्तेवरून पाय उत्तार करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. तसेच कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तरप्रदेश मधून भाजप विरोधात बंड पुकारला आहे. या लोकसभा निवडणुकीला आम्ही एक युद्ध म्हणून पाहात आहोत. त्यामुळे भाजपला फायदा करून देण्याऐवजी मी मृत्यूला कवटाळेल, अस म्हणत प्रियांका गांधी यांनी भीष्मप्रतिज्ञा केली आहे. यावेळी प्रियांका गांधी या रायबरेली येथे प्रचारार्थ आल्या असता पत्रकारांशी बोलत होत्या.
यावेळी गांधी म्हणाल्या की, ‘आम्ही प्रत्येक ठिकाणी सक्षण उमेदवार दिला आहे. काँग्रेसच्या उमेदवारामुळे भाजपला फायदा होणार नाही. आमच्यामुळे भाजपला फायदा होईल अशी परिस्थिती कोठेही नाही. त्यांचा फायदा करून देण्यापेक्षा मी मृत्यूला कवटाळेल.’
दरम्यान प्रियंका गांधी यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये प्रचाराची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे प्रियांका गांधी या उत्तर प्रदेश मध्ये गाव निहाय प्रचार करत असून कॉंग्रेसला बहुमत मिळवून देण्याचा त्या प्रयत्न करत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

