🕒 1 min read
Devoleena Bhattacharya | टीम महाराष्ट्र देशा: स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘साथ निभाना साथिया’ (Sath Nibhana Sathiya) मधील ‘गोपी बहू’ (Gopi Bahu) घराघरात पोहोचलेली आहे. या मालिकेतील गोपी बहुचे पात्र साकारणारी अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य (Devoleena Bhattacharya) नेहमीच चर्चेत असते. देवोलीना कॅमेरापासून दूर जरी असली, तरी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेचे कारण ठरते. ‘इश्क मे चर्चा’ या मालिकेमध्ये विशाल सिंग (Vishal Singh) आणि देवोलीना एकत्र दिसले होते. त्यानंतर या दोघांचे फोटो सतत व्हायरल व्हायला लागले. अशात नुकतच सोशल मीडियावर देवोलीनाच्या हळदीचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती गालावर हळद आणि हातावर मेहंदी लावताना दिसत आहे. हे फोटो बघून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गोपी बहू गपचूप लग्न करत असल्याचा दावा चाहत्यांकडून होत आहे.
देवोलीना भट्टाचार्य आणि विशाल सिंग यांच्या लग्नाच्या बाबतीत सतत चर्चा सुरू असते. दरम्यान, देवोलीना आणि विशालचे असे काही फोटो व्हायरल झाले आहेत की, त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या फोटोमध्ये देवोलीना हातावर मेहंदी आणि गालावर हळद लावून बसलेली आहे. त्याचबरोबर एखाद्या वधूप्रमाणे नटून ती विधींचा आनंद घेताना दिसली आहे. या फोटोमध्ये ती विशाल सिंग सोबत दिसली आहे. त्यामुळे देवोलीना आणि विशाल लग्न करत आहे, असा अंदाज चाहते बांधत आहे.
देवोलीनाने तिच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर इन्स्टा स्टोरीमध्ये हळद आणि मेहंदी समारंभाचे फोटो शेअर केले आहे. हे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये देवोलीना आणि विशाल दोघे या विधीचा आनंद घेताना दिसत आहे. देवोलीनाने यामध्ये पिवळ्या रंगाच्या ड्रेस आणि फुलांचे दागिने परिधान केलेले आहे. तिच्या या फोटोवर सगळे आश्चर्याने कमेंट करत विचारत आहे, देवोलीना खरंच लग्न करणार आहे का?

गोपी बहू लग्नगाठ कुणासोबत बांधत आहे? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अशा परिस्थितीत तिने विशालसोबत फोटो शेअर केलेला पाहून, ती त्याच्या सोबतच लग्न गाठ बांधणार आहे असा अंदाज वर्तवला जात आहे. कारण यापूर्वीही देवोलीना आणि विशालचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये विशाल तिला प्रपोज करताना दिसला होता. त्यानंतर त्या दोघांनी स्पष्ट केले होते की, ते फक्त एका म्युझिक व्हिडिओचे प्रमोशन होते.
महत्वाच्या बातम्या
- Maharashtra Weather Update | राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी
- Rishabh Pant | टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने ऋषभ पंतबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा
- Nitesh Rane | “..तर आदित्य ठाकरेंसह आघाडीचे तीन मंत्री जेलमध्ये असते”; नितेश राणेंचा पवारांवर पलटवार
- Prakash Ambedkar | “काँग्रेसने आम्हाला चेपलं, आता उद्धव ठाकरेंनी ठरवावं की…”; शिंदे-फडणवीस यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया
- Breaking News | मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उद्या अचानक दिल्ली दौऱ्यावर, राजकीय घडामोडींना वेग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
