Share

”या” मोठ्या कंपनीचा आयपीओ मार्च महिन्यात येणार

Published On: 

मुंबई : Initial public offering (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) म्हणजे आपल्या कंपनीचे शेअर्स बाजारात सामान्य लोकांना उपलब्ध करून देणे. इनिशियल पब्लिक ऑफरिंग द्वारे एखादी कंपनी आपले समभाग (शेअर्स ) शेअर बाजारात उपलब्ध करून देते म्हणजे तिला त्या माध्यमातून लोकांनी गुंतवणूक केलेला पैसा मिळतो.

भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असणारी LIC (एलआयसी) ही भारत सरकारच्या मालकीची कंपनी आता शेअर बाजारात उतरणार आहे. म्हणजेच LIC चा आयपीओ (IPO) भारतीय लोकांना २०२२ च्या मार्च महिन्यात उपलब्ध होणार आहे. एलआयसीचे समायोजित मूल्य (एम्बेडेड व्हॅल्यू) जवळपास चार लाख कोटी रुपये इतके आहे. भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असणारी LIC पुढच्या महिन्यात आपला IPO बाजारात दाखल करण्याची शक्यता आहे. LIC (एलआयसी) या IPO मधून १५ लाख कोटी रुपये म्हणजेच २०३ अब्ज डॉलर बाजारातून उभे करण्याची शक्यता आहे, असे झाल्यास LIC चा IPO हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO ठरण्याची शक्यता आहे.

LIC च्या या आयपीओला शेअर बाजार तज्ञांकडून mother ऑफ all IPO असे संबोधले गेलं आहे. LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असून तिचे सध्याचे समायोजित मूल्य ४ लाख कोटी रुपये इतके आहे. मात्र पुढील महिन्यात LIC चा IPO आल्यावर LIC चे समायोजित मूल्य तब्बल १५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचणार आहे. मार्च – एप्रिल २०२२ या दोन महिन्यात केंद्र सरकार LIC मधील आपली १० टक्क्यांपर्यंतची हिस्सेदारी विकणार आहे. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे केंद्र सरकारकडे निर्माण झालेली आर्थिक तूट भरून काढण्यासाठी हा पैसा वापरला जाण्याची शक्यता आहे. LIC भारतीय बाजारात सूचिबद्ध झाल्यावर भारत देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी ठरणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारत देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. तर LIC च्या आधी देशातील दुसरी मोठी कंपनी असणारी TCS तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या :   

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!