🕒 1 min read
मुंबई : इंग्लंड दौऱ्यावरील पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णीत अवस्थेत संपला. यानंतर १२ ऑगस्टपासुन लॉर्ड्सवर दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ लंडलला पोहोचला आहे.
लॉर्ड्सला क्रिकेटची पंढरी म्हणले जाते. या मैदानावर सध्याच्या भारतीय फलंदाजाची कामगीरी फारशी चांगली नाहीये. त्यात कर्णधार कोहली गेल्या एक दीड वर्षापासून एकही शतक झळकावू शकला नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तो भोपळा न फोडताच बाद झाला होता. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. मात्र या मैदानावर त्याची कामगीरी चांगली राहीलेली नाही. कोहलीने कसोटी २७ शतके झळकावली आहे. मात्र लॉर्ड्सवर त्याला अर्धशतकही करता आले नाही. या मैदानावर त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही २५ आहे.
विराटने या मैदानावर ४ डावात केवळ ६५ धावा केल्या आहेत. हीच गत चेतेश्वर पुजाराची आहे. त्याने २ कसोटी सामन्यात केवळ ८९ धावा केल्या आहेत. यात ४३ त्यांची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तर के एल राहुलने केवळ १८ धावा केल्या आहेत. मात्र भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने २०१४ साली या मैदानावर १०३ धावांची शतकी खेळी केली होती. या सामन्यात भारताने ९५ धावांनी विजय मिळवला होता. तर रोहित शर्मा आणि रिषभ पंत यांचा या मैदानावरील पहिलाच सामना आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- प्रशिक्षक रवी शास्त्री लवकरच सोडणार टीम इंडिया, इंग्लंडमध्ये केला खुलासा
- भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मोईन अलीचे संघात पुनरागमन
- महाराष्ट्रात आज ५,६०९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर…
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
- ‘MPSC आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची नियुक्ती’; प्रीतम मुंडे लोकसभेत कडाडल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
