Share

शरीरात प्राण असेपर्यंत समाजकार्य करत राहणार; अण्णा हजारेंनी निवृत्तीच्या अफवा फेटाळल्या!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- गावातील सगळे कार्यकर्ते आज जे काम करत आहेत, ते पाहून प्रत्यक्षात काम करताना जेवढा आनंद झाला नव्हता, त्यापेक्षाही अधिक आनंद आता गावातील विकासकामे पाहून होतो. यापुढे मी काम सुरू ठेवले, तर कार्यकर्ते गहाळ पडतील, तसे होऊ नये, यासाठी राळेगणसिद्धीच्या कामातून मी निवृत्त होत आहे, अशी घोषणा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.

अश्या बातम्या अनेक माध्यमांतून आणि सोशल मीडियातून सुरू झाल्या आहेत. परंतु मी कसला निवृत्त होतो आणि निवृत्त होऊन काय करणार? शरीरात प्राण असेपर्यंत समाज कार्य करत राहणार, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.

नवरात्रीच्या कार्यक्रमाची सांगता करताना हजारे यांनी राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, गावातील अनेक तरुण कार्यकर्ते पुढे आले आहेत. त्यांनी गावासाठीचे काम नेटाने पुढे सुरू ठेवले आहे. पूर्वी अशा कामांसाठी गावकऱ्यांना माझ्या कुबड्या घ्याव्या लागत होत्या.

आता कार्यकर्ते हिमतीने काम करताना पाहून आनंद वाटतो. त्यामुळे गावाच्या रोजच्या कामात लक्ष घालणे हळूहळू कमी करत आहे, असे हजारे म्हणाले होते. त्यावरून हजारे रिटायर होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर पसरली आहे.

मात्र, मी रिटायर झालो नसून शरीरात प्राण असेपर्यंत समाज कार्य करत राहणार आहे. गेल्या काही महिन्यांत माझ्या गैरहजेरीत गावातील मंडळींनी खूप चांगल्या पद्धतीने राळेगणमध्ये विकास कामे केली. ते पाहून खूप समाधान वाटले म्हणून मी म्हटले यापुढे मी गावातून थोडे लक्ष कमी करतो. तुम्ही गावकरी खूप चांगले काम करत आहात. राळेगण परिवारातील कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचा उद्देश आहे, मात्र निवृत्ती वगैरे काही नाही, असे अण्णा हजारे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!