Share

BCCI चुकीचा पायंडा पाडत आहे, मांजरेकरांचा गंभीर आरोप

Published On: 

मुंबई : कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता सध्याआयपीएलचे सामने या देशांमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. तर त्यानंतर होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला देखील मंजुरी मिळाली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरमध्ये सुरूवात होणार असून, १० नोव्हेंबरला IPL Final झाल्यानंतर १४ नोव्हेंबपर्यंत भारताचे खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत.

या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध ३ एकदिवसीय, ४ कसोटी आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र या दौऱ्यासाठी उपकर्णधार रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आलेले नाही. रोहित ऐवजी एकदिवसीय आणि टी२० मालिकेत लोकेश राहुलला उपकर्णधारपद देण्यात आलं आहे.

लोकेश राहुलला निर्धारित षटकांच्या संघात स्थान मिळणं अपेक्षित होतं पण कसोटी संघात त्याला स्थान मिळाल्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकेश राहुलचा कसोटीतील कामगिरी पाहता त्याला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत स्थान देण्यात आलेले नव्हते. जानेवारी २०२०मध्ये झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यातही त्याला टी२० आणि वन डे संघात जागा मिळाली होती, पण कसोटी संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नव्हता.

IPLमध्ये राहुलने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आले. यावर संजय मांजरेकर यांनी ट्विट करत निवड समितीवर टीका केली आहे. “IPLच्या कामगिरीच्या आधारावर एखाद्या खेळाडूला कसोटी संघात स्थान देऊन निवड समिती चुकीचा पायंडा पाडत आहे.

विशेषत: ज्या खेळाडूची कसोटी कारकीर्द फारशी चांगली राहिलेली नाही, अशा खेळाडूला संधी देणं चुकीचं आहे. अशा प्रकारच्या निवडीमुळे रणजीमध्ये चांगली कामगिरी करणारी नवीन पिढी नाउमेद होण्याची शक्यता अधिक आहे”, असे ट्विट मांजरेकर यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!