मुंबई- राज्यात आज ७,८३६ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण १४ लाख ७८ हजार ४९६ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.३९ टक्के एवढे झाले आहे.
काल राज्यात ५,३६३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.राज्यात आज ११५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७ लाख ३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ५४ हजर ०२८ (१९.०१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात २५ लाख २८ हजार ९०७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३ हजार २३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १ लाख ३१ हजार ५४४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दरम्यान, भारतात कोटींहून अधिक कोविड नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून रुग्ण बरे होण्याचा दर 90 टक्के आहे तर भारतात रुग्ण बरे होण्याची संख्या जगात सर्वाधिक आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी यावेळी दिली.
भारतात, प्रति दशलक्ष रुग्ण संख्या आणि प्रति दशलक्ष मृत्यू जगात सर्वात कमी असल्याचे ते म्हणाले. एक लाखावरून दहा लाख रुग्ण बरे होण्यासाठी आम्हाला 57 दिवस लागले, पण नुकतेच बरे झालेल्या 10 ;लाख रुग्णांची नोंद केवळ 13 दिवसात झाली आहे, ही बाब अतिशय समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतामध्ये दैनंदिन कोविड रुग्णसंख्येमध्ये सातत्याने घट होत आहे. 23 ते 29 सप्टेंबर दरम्यान 83,232 वरून 21 ते 27 ऑक्टोबरमध्ये 49,909 इतकी घट झाली आहे. गेल्या 24 तासात 36,470 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली आहे, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘केवळ मराठा समाज नाही तर संपूर्ण महाराष्ट्र वेठीला धरला गेला आहे’
- आयकर विभागाची दिल्ली,एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तराखंडमध्ये मोठी कारवाई
- कुमार सानुच्या पोरानं अक्कल ठेवली गहाण, म्हणे मराठीची लाज वाटते…
- ‘भ्रष्टाचार संपवणं ही कुठल्या एका संस्थेची जबाबदारी नसून सर्वांनी मिळून भ्रष्टाचार संपवायला हवा’
- कोरोना रुग्णांकडून जास्त दर घेणाऱ्या दोन नामांकित खाजगी रुग्णालयांवर कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

