नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ७० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. २६ जानेवारी झालेल्या गोंधळ्यानंतर आता या आंदोलनाला वेगळं वळण लागल्याचं दिसून येत आहे.
परदेशी कलाकारांनी शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिल्यानंतर देशातील क्रिकेटर्स व बॉलिवूड कलाकारांच्या एका गटाने हा मुद्दा देशातील अंतर्गत विषय असून बाहेरील व्यक्तींना ढवळाढवळ करू नये अशी भूमिका घेत मोदी सरकारचं एकप्रकारे समर्थनच केलं आहे. अशातच शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी दिल्लीच्या सीमेवर जाऊन शेतकऱ्यांची भेट होती.
आता विरोधी पक्षातील खासदारांचं शिष्टमंडळ देखील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार होतं. मात्र, या शिष्टमंडळाला गाझीपूर बॉर्डरवर रोखण्यात आल्याचं समजत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील आहेत. यानंतर त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र देखील सोडलं आहे. ‘हे सरकार अतिशय असंवेदनशील असून आम्हाला रोखणं हे धक्कादायक आहे असं त्या म्हणाल्या आहेत.
तर, ‘शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला आता दोन महिने झाले आहेत. तरीही त्यांना न्याय मिळत नाही. बॉर्डरवर देखील अशी स्थिती नाही. पाकिस्तान, चीन बॉर्डरला मी गेले आहे. तिथे ही अशी परिस्थिती नाही. मात्र, येथे अशी धक्कादायक परिस्थिती आहे. हे आमचे शेतकरी आहेत. त्यांच्याशी चर्चा करु दिली जात नाही. त्यांना भेटू दिले जात नाही, याला काय म्हणावे ?,’ असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीनं शर्जिलला पळून जाण्यास मदत केली’
- धनंजय मुंडेच नव्हे तर महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांवर देखील झाले आहेत गंभीर स्वरूपाचे आरोप
- पक्षांतराचा इतिहास असलेल्या नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्ष करण्याचे धाडस पक्ष श्रेष्ठी करणार का ?
- “…तेव्हा राष्ट्रभक्तीचा आव आणणारे सर्व सेलिब्रिटी कुठे होते?”
- उत्तरेकडील वाऱ्यामुळे तापमानात घट, परभणीचे तापमान ९.१ अंश


