मुंबई : राज्याचा कारभार जिथून चालवला जातो, त्या मंत्रालयात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मंत्रालयातील उपहारगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. मंत्रालयात राजपात्रित अधिकाऱ्यांच्या उपहारगृहाच्या खालील बाजूस हे एक रुम आहे. तिथे हे धक्कादायक चित्र आढळून आले.
या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्या कशा? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याचं कारणही महत्वाचं आहे. संपूर्ण राज्याचा कारभार या मंत्रालयातून पाहिला जातो. जर सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर येथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची चौकशी केली जाते. पण मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारुच्या बाटल्या आत आल्याच कशा? असा प्रश्न सध्या सर्वच स्तरांतून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, मंत्रालयातील उपहारगृहाच्या शेजारी दारूच्या बाटल्यांचा खच दिसून आल्याने आता सरकार टीका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल, तसेच हे कृत्य करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध शकिब अस हसनने ओलांडला मैलाचा टप्पा, अशी कामगीरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू
- व्यवसायिक आस्थापनांना लागणार पूर्ण शुल्क, गुंठेवारी कक्षातील अधिकाऱ्यांची माहिती
- अल्प मदत जाहीर करून राज्य सरकारने पूरग्रस्तांची थट्टा केली; सुधीर मुनगंटीवार यांचे टीकास्त्र
- ‘भास्कर जाधव तुझी औकात २०२४ ला तुला दाखवून देऊ; आता जेवढं उडायचं तेवढं उडून घे’
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
