Share

अर्णबच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार – राम कदम

Published On: 

मुंबई : अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.

अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची रवानगी अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली होती. काल, अर्णबच्या जामीनावर सुनावणी झाली मात्र तिथे देखील त्याला न्यायालयाने दिलासा न दिल्याने आज त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

दरम्यान, अर्णबवरील ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी निषेध केला. तर, राज्यभरात अनेक ठिकाणी भाजपतर्फे आंदोलन देखील करण्यात आलं. अर्णबची सुटका व्हावी म्हणून उपोषण करणारे भाजपचे आमदार राम कदम आता अर्णव यांच्या सुटकेसाठी थेट सिद्धिविनायकाला साकडे घालणार आहेत.

राम कदम हे घाटकोपर येथील त्यांच्या निवासस्थानापासून ते प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पदयात्रा करणार असून अर्णव यांच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार असल्याचं कदम यांनी म्हटलं आहे.अर्णब यांना करण्यात आलेली अटक चुकीची आहे. त्याचा आम्ही विरोध करत आहोत.

या अटकेचा सर्वच स्तरातून विरोध होत आहे, असं सांगतानाच ज्या दिवशी अर्णब यांची सुटका होईल, त्याच दिवशी आम्ही दिवाळी साजरी करू, असं कदम यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारला ऐनकेनप्रकारे अर्णब यांना या प्रकरणात अडकवायचे आहे. त्यामुळेच त्यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली असून येत्या काळात ठाकरे सरकारला त्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा कदम यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!