Share

‘महाआघाडीचं सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबला तर खटारा’; अण्णा हजारेंचा घणाघात

Published On: 

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सद्याच्या परिस्थितीपासून ते भ्रष्टाचारावर अटकावायापर्यंत अनेक बाबींवर भाष्य केलं. त्यांनी महाविकास आघाडीच्या कारभारावर देखील टीकास्त्र देखील सोडलं आहे.

चित्रपटगृह उघडली, रेल्वे सुरु केली पण मंदिर का उघडली नाहीत? असा सवालंही अण्णांनी राज्य सरकारला केला आहे. महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे चलती का नाम गाडी आहे. थांबला तर खटारा, अशी बोचरी टीका महाविकास आघाडीच्या सरकारवर करत अण्णांनी लक्ष्य केलं.

तर, लोकपालनंतर लोकायुक्त कायदा करायचा आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वगळता इतर मंत्र्यांकडून त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. तसेच मुख्यमंत्र्यांनीही कोरोनानंतर याबाबत पावले उचलू असे सांगितले. दरम्यान, लोकायुक्त कायदा न झाल्यास पुन्हा आंदोलनाचे रणशिंग फुंकणार असल्याचा इशाराही अण्णा हजारे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!