Share

…तर पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील : निर्मला सीतारमण

Published On: 

नवी दिल्ली : पेट्रोल डिझेलवरील किंमत कमी करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक उपाय सुचवला. सीतारमण म्हणाल्या की पेट्रोल डिझेलचे भाववाढ हा गंभीर विषय आहे. फक्त मी किंवा अर्थमंत्रालय यावर काही करू शकत नाही. यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी बैठक घेऊन यावर उपाय काढला पाहिजे तरच पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असा विश्वासही त्यांने व्यक्त केला.

पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्य माणासांचे बजेट कोलमडत आहे. तसेच गॅसचे भाव वाढल्याने सामान्य नागरिकांनी रोष व्यक्त केल आहे. यात एकटं अर्थमंत्रालय काही करू शकत नाही असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केले आहे. पण पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्यासाठी त्यांनी एक उपाय सुचवला आहे.

चेन्नईत्त एका कार्यक्रमात सीतारमण म्हणाल्या की ‘ओपेक देशानी तेल उत्पादन विक्रीचा जो अंदाज लावला होता तो खोटा ठरण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. पेट्रोल डिझेलचे भाव सरकार ठरवत नाही. सरकारने पेट्रोल डिझेलला तांत्रितकदृष्ट्या मुक्त केले आहे. तेल कंपन्या कच्चे तेल आयात करतं, रिफाईन करून विकतं’ असे सीतारमण म्हणाल्या.

तसेच पेट्रोल डिझेलवरील करामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो हे कर घटवल्यास राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा महसूल घटू शकतो. म्हणून मी लगेच कर कमी करण्याची घोषणा नाही करू शकत असे सीतारमण म्हणाल्या. राज्याला आणि केंद्राला विकासकामसाठी निधी लागतोच असेही सीतारमण म्हणाल्या.

 

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!