Share

‘या’ मुलीने आपल्याच मृत्यूची केली होती भविष्यवाणी,जिथे सांगितलं होतं तिथेच मिळाला मृतदेह

Published On: 

ब्राझील- ब्राझीलमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीने फेसबुकवर तिच्या हत्येचा अंदाज वर्तविला आणि दुसऱ्याच  दिवशी तिची हत्या करण्यात आली. फेसबुक पोस्टमध्ये या मुलीने तिची डेडबॉडी कुठे मिळेल याबाबत सांगितले होते त्याच ठिकाणी पोलिसांना तिचा मृतदेह सापडला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

ब्राझीलच्या अमेझॉनस येथे क्रिश्चन गुमेरस  या 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली. क्रिश्चियन गुमरने तिच्या हत्येच्या आदल्या दिवशी एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘मी सर्वांना निरोप देण्यासाठी आले आहे. मी लवकरच मरेन.

क्रिश्चन गुमरने फेसबुक पोस्टमध्ये सांगितले की, त्याने ड्रग डीलर्सकडून मोठे कर्ज घेतले होते. ज्याची तिला परतफेड करता आली नाही. ख्रिश्चनने सांगितले की कर्जाच्या भांडणातून तिची हत्या होणार आहे. याशिवाय ख्रिश्चनने दुसऱ्या एका फेसबुक पोस्टमध्ये सांगितले होते की, मृत्युनंतर तिचा मृतदेह कुठे सापडेल.

पीडितेच्या हत्येच्या दुसऱ्याच  दिवशी, ख्रिश्चन गुमरच्या फेसबुक अकाऊंट वरून आणखी एक पोस्ट केली गेली. ज्यामध्ये ख्रिश्चनची डेडबॉडी कोठे आहे याबद्दल सांगितले गेले. असे बोलले जात आहे कि मारेकऱ्यांनी हि पोस्ट केली असावी. मारेकऱ्याने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की ही घटना कमांडो वर्मेलहो नावाच्या टोळीने घडविली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना 12 फेब्रुवारीलाच ख्रिश्चन बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. पण ते घटनास्थळी पोहचण्याआधीच तिची हत्या करण्यात आली. ख्रिश्चनाला 13 फेब्रुवारी रोजी गोळी घातली असल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिसांचा असा विश्वास आहे की कमांडो वर्मेलहो टोळीचा ख्रिश्चन गुमरेस हत्येशी काही संबंध नाही. मारेक्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी या टोळीवर आरोप केला आहे.आम्ही आत्ता या प्रकरणाचा तपास करत आहोत. लवकरच आरोपी पकडला जाईल असे पोलिसांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!