Share

जेव्हा कलाम राष्ट्रपती झाले तेव्हा अटलजी मोदींना राजधर्म शिकवत होते

Published On: 

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारासंघाचे आमदार चंद्रकांत पाटील पुन्हा एका नव्या विधानामुळे चर्चेत आलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं, असं अजब विधान चंद्रकांत पाटलांनी केल आहे.

काही जण नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध काहीतरी काळंबेरं पसरवत असतात. पण अब्दुल कलाम यांच्यासारख्या कर्तृत्ववान माणसाला, संशोधक माणसाला नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती केलं, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केल आहे. यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर विरोधकांकडून सडकून टीका होत आहे. यावरून अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे.

अब्दुल कलाम जेव्हा राष्ट्रपती झाले; तेव्हा अटलजी सत्तेत होते. कलाम यांना राष्ट्रपती करण्याचा निर्णय एकमताने झाला होता. त्यामध्ये नरेंद्र मोदींचा सहभाग नव्हता, उलट त्या काळात अटलजी मोदींना राजधर्म काय?, याचा धडा शिकवत होते, अशा शब्दात म्हणत नवाब मलिकांनी चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, देशभक्त मुस्लिम आणि देशद्रोही मुस्लिम यांच्यातला फरक समजावून सांगताना काश्मिरमध्ये बॉम्बस्फोट करणारा मुस्लिम देशद्रोही तर देशसाठी झटणारा मुस्लिम देशभक्त मुस्लिम असं म्हणत, आपला सगळ्या मुस्लिमांना विरोध नाही. तर देशद्रोही मुस्लिमांना विरोध असल्याची भूमिका चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केली होती.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!