दुबई: आज सायंकाळी होणाऱ्या ‘अव्वल-१२’ फेरीतील लढतीत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन संघांत आज लढत होणार आहे. रशीद खान आणि मुजीब उर रहमान या फिरकी जोडीविरुद्ध पाकिस्तानच्या फलंदाजांचा आज चांगलाच कस लागणार आहे.
भारत आणि न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान संघाचे उपांत्य फेरीतील स्थान आता जवळपास पक्के मानले जात आहे. शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि हसन अली या वेगवान त्रिकूटासह कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या सलामी जोडीने पाकिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
दरम्यान मोहम्मद नबीच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानने पहिल्या सामन्यात स्कॉटलंडचा १३० धावांनी पराभव केला होता. तर रशीद-मुजीबच्या जोडीने तब्बल नऊ बळी घेतले होते. आजच्या सामन्यात रशीद खान आणि मुजीब उर रहमान या फिरकीपटूंपुढे पाकिस्तानच्या फलंदाजांचा चांगलाच कस लागणार आहे. दरम्यान आज सायंकाळी ७ वाजता पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान असा सामना होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भारत-पाकिस्तान अंतिम सामना व्हावा; पाकिस्तानचे प्रशिक्षक सकलेन मुश्ताकची इच्छा
- इंडिज-बांगलादेश संघांत आज होणार लढत; आव्हान टिकविण्यासाठी विजय अनिवार्य
- महिलेची १८ लाखांची फसवणूक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांना अटक
- ‘मन्नत’ पूर्ण झाली! अखेर आर्यन खानला जामीन मंजूर, मुंबई हायकोर्टाचा निर्णय
- हायकोर्टाकडून समीर वानखेडेंना दिलासा, अटक करण्यापूर्वी तीन दिवस अगोदर नोटीस द्यावी लागणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

