🕒 1 min read
मुंबई – मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याला अटक केली. त्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये आतापर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणेने 5 गाड्या जप्त केल्या आहेत.
सचिन वाझे यांचा एनआयएकडून तपास केला जात असून यात अनेक गंभीर बाबी उघड होत आहेत.उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवास्थानाजवळ स्फोटके ठेवलेली कार आढळून आली होती. यामध्ये कारमालकाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
एनआयएने वाझे यांना आता अटक केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारची कोंडी झाली आहे. सत्ताधाऱ्यांनी वाझे यांचे त्यावेळी जोरदार समर्थन केले होते यात सर्वात पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आघाडीवर होते. त्यामुळे विरोधीपक्षांनी वाझे यांची पाठराखण करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची आणि विशेषतः शिवसेना नेत्यांची चौकशी करावी, अशी मागणी लावून धरली जात आहे.
ज्या अर्थाने शिवसेना परमवीर सिंग यांच्या बदलीची आणि त्या अगोदर वाझे यांची बाजू घेत होती असं वाटतं मातोश्रीसाठी सगळे दोन नंबरचे धंदे करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. हे दोन अधिकारी खरं बोलले तर आर्थर रोड जेल हे नवीन मातोश्री होऊ शकतं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 19, 2021
दरम्यान,भाजपनेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर याच मुद्द्यावरून तोफ डागली आहे. ज्या अर्थाने शिवसेना परमवीर सिंग यांच्या बदलीची आणि त्या अगोदर वाझे यांची बाजू घेत होती असं वाटतं मातोश्रीसाठी सगळे दोन नंबरचे धंदे करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. हे दोन अधिकारी खरं बोलले तर आर्थर रोड जेल हे नवीन मातोश्री होऊ शकतं असे भाकीत त्यांनी वर्तविले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुजा चव्हाण आणि मनसुख हिरेन प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाड?
- कोरोना वाढला ; जम्बो कोविड केअर सेंटर होणार पुन्हा सुरू
- ४५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला लस द्यावी; राज्य सरकारची केंद्राकडे मागणी
- सान्या मल्होत्राच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज
- आमदार गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
