Share

साराअली खान आणि श्रद्धा कपूरच्या मेकअप आर्टिस्टमध्ये जुंपली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्रीमध्ये होणारा वाद हा नेहमीच चर्चेचा विषय आसतो. मात्र कधी बॉलीवूड अभिनेत्रींच्या मेकअप आर्टीस्ट मध्ये वाद झालेला ऐकला आहे का? बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि साराअली खानचे मेकअप आर्टीस्ट मध्ये वादाची ठिणगी पडली आहे. अभिनेत्री सारा अली खानच्या मेकअप आर्टिस्टवर आणि श्रद्धा कपूरच्या मेकअप आर्टिस्टनं शारिरीक हिंसेचा आरोप केला आहे.

फ्लोरियन हुरेल हा सेलिब्रेटी मेकअप आर्टिस्ट आहे. हुरेलने सारा अली खान, शिल्पा शेट्टी, सोनाक्षी सिन्हा, राकुल प्रीत सिंग यांसारख्या अभिनेत्रीसोबत काम केलं आहे. फ्लेरियन सध्या साराअली खानचा मेकअप आर्टीस्ट म्हणून काम करत आहे. फ्लोरियनवर त्याची पुर्व प्रेमीका आणि श्रद्धा कपूरची मेकअप आर्टिस्ट म्हणून काम पाहिलेल्या हियावी सहगलने गंभीर आरोप केले आहेत.हियावी सहगलने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी हियावीनं एक प्रश्नोत्तरांचं सेशन घेतलं होतं. ज्यात फ्लोरियनसोबतच्या तिच्या रिलेशनशिपबद्दल प्रश्नला उत्तर देताना हियावीनं लिहिलं, बॉसची असिस्टंट म्हणून सुरू झालेलं नातं पुढे मैत्रीत आणि नंतर प्रेमात बदललं. डेटिंग, एकत्र घर घेणं आणि साखरपुडा या गोष्टी कमी वेळात घडल्या. हियावीनं फ्लोरियनसोबतचे काही प्रायव्हेट चॅट सुद्धा शेअर केले.

https://www.instagram.com/p/CMg0OONDJEh/

हियावीचे हे सर्व आरोप फ्लोरियननं फेटाळले आहेत. तिच्या आरोपांनंतर त्यानं सोशल मीडियावर एका पोस्ट शेअर करत लिहीले आहे, ‘माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहे. या आरोपाद्वारे माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरु आहे’ असा आरोप फ्लोरियननं हियावीवर केला आहे. स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी घाम गाळावा लागतो, मेहनत करावी लागते. माझी विनंती आहे, माझ्याबाबत अशा प्रकारच्या कोणत्याही वक्तव्यांवर विश्वास ठेवू नका. सत्याचा अखेर विजय होतोच.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!