Share

‘ती इतका दिवस गप्प का होती?’, पत्नीच्या आरोपांनंतर अनिकेतची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावसह त्याच्या आई- वडिलांविरोधात पत्नी स्नेहा चव्हाण हिने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पत्नी स्नेहाने पती अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीत तिने अनिकेतवर अनैतिक संबंध तसेच सिनेक्षेत्रात त्याच्यापेक्षा माझं नाव मोठे होईल, या भितीने पतीने जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे सांगितले आहे. तसेच अभिनेत्याने गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचं तिने म्हंटल आहे. अभिनेत्याच्या आई-वडिलांनी  मुलाच्या अत्याचाराला न रोखता त्याला साथ दिली, असंही तिने तिच्या तक्रारीत म्हंटल आहे. अनिकेत आणि पत्नी स्नेहा यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरु होते अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, पत्नीने केलेल्या तक्रारीसंदर्भात अभिनेत्याने एका वृसंस्थेला आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्याने म्हंटले आहे की, ‘स्नेहा ५ फेब्रुवारी २०२१ पासून माझ्यासोबत राहत नाही. जाताना ती स्वतःचे सोन्याचे दागिने सोबत घेऊन गेली आहे. तिला माझ्यापासून विभक्त व्हायचं होतं. आणि त्यासाठी तिने २५ लाखांची पोटगी मागितली होती. पण मी ते देण्यास तिला नकार दिला होता. आणि रीतसर कोर्टात जाऊन घटस्फोट घेऊया असे सांगताच स्नेहा आणि तिच्या कुटुंबियांकडून मला धमक्या दिल्या जाऊ लागल्या. मी जर पैसे दिले नाहीत तर माझं नाव बदनाम केलं जाईल असंही मला सांगितलं गेलं होतं…पण मी याकडे दुर्लक्ष केलं.

स्नेहाचा स्वभाव हा आधीपासूनच रागीट होता. स्नेहा आधीपासूनच माझ्यावर संशय घेत होती. ती माझ्या कोणत्याही मैत्रिणीसोबत किंवा अभिनेत्रीसोबत माझे नाव जोडायची. अभिनयक्षेत्रात तिला काम मिळत नव्हतं यासाठीही ती मला दोष देत होती. तिचा स्वभाव केवळ रागीट नाही तर विक्षिप्त आहे. मला अजूनही कळत नाही ती ५ फेब्रुवारीपासून आजपर्यंत म्हणजे १० महिने गप्प का राहिली? आजचा दिवसच का निवडला. माझ्या वडिलांचा आज वाढदिवस आहे, आणि मुद्दामहून स्नेहा आणि तिच्या कुंटुंबियांनी आम्हाला मानसिक त्रास देण्यासाठी हे केलं असल्याचं अभिनेत्याने म्हंटले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!