Share

कृषी कायद्यावर राज्यसभेत चर्चा सुरू असताना, पवार का गैरहजर होते?

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : गेले काही दिवस शेतकरी आंदोलनामुळे देशातील वातावरण तापले आहे.कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी गेली ३६ दिवस दिल्लीमध्ये आंदोलन सुरु आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने देखील या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र राष्ट्रवादीच्या भूमिकेवर राष्ट्रीय कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी टीका केली आहे.

केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस रस्त्यावर उतरण्याची भाषा करीत आहे. वास्तविक, ज्येष्ठ नेते शरद पवार हे केंद्रीय कृषिमंत्री असतानाच, कृषी कायद्याचा मसुदा तयार झाला होता. शेती हा पवारांचा आत्मा असल्याचे म्हटले जाते. या कायद्यावर राज्यसभेत चर्चा सुरू असताना, पवार का गैरहजर होते? असा सवाल पाशा पटेल यांनी उपस्थित केला आहे.

टेल म्हणाले,त्यांचा कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध आहे. सध्या त्यांनी नवीन शेतकरी कायद्याविरुद्ध घेतलेला पवित्रा ही त्यांची राजकीय अपरिहार्यता आहे, अशी टीका देखील पाशा पटेल यांनी केली.

दरम्यान, नवीन कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनच्या प्रतिनिधींमध्ये काल झालेल्या चर्चेत 4 पैकी 2 मुद्द्यांवर दोन्ही बाजूंची सहमती झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना काल ही माहिती दिली.चर्चा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात झाली असून उर्वरित दोन मुद्द्यांवर चर्चेसाठी पुढच्या महिन्याची 4 तारीख निश्चित केली असल्याचं तोमर यांनी सांगितलं. शेतकऱ्यांसाठी वीज वितारणासंदर्भातला कायदा आणि पर्यावरणासंबंधीचा कायदा या दोन मुद्द्यांवर आज चर्चा झाल्याचं तोमर म्हणाले.

एका बाजूला सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांशी भांडत बसले असताना दुसऱ्या बाजूला शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. या देशात मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. त्यामुळे सरकारवर दबाव आणता येईल. परंतु तसे चित्र नाही. विरोधी पक्ष दमदार नसल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. विरोधी पक्षाने तंबूत बसून निदर्शने करण्यासारखी स्थिती असल्याची टीका शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी काल केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!