नवी दिल्ली : यावर्षी नोव्हेंबरमध्ये परिवहन मंत्रालयाने सर्व चारचाकी वाहनधारकांना एफएएसटीएग १ जानेवारी २०२१ लागू करण्याचे आदेश प्रसिद्ध केले होते. त्या नुसार आता सर्व वाहनांसाठी ‘फास्टॅग’ अनिवार्य असणार आहे. अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी दिली.
देशातील टोल वसुली सुलभ आणि रहदारी सुरळीत करण्यासठी सरकारकडून हे पाउल उचलण्यात आले आहे. २०१७ पासून, नवीन चार चाकी वाहनांच्या नोंदणीसाठी एफएएसटीएग अनिवार्य करण्यात आले होते आणि ते वाहन निर्माता किंवा त्यांच्या व्यापा ्यांद्वारे पुरविले जात होते.
त्यांनतर आता अद्याप देखील अनेक वाहन चालकांच्या फास्टॅग प्रक्रिया पूर्ण झाली नसून या पार्श्वभूमीवर 1 जानेवारीपर्यंत जर तुमच्या गाडीमध्ये फास्टॅग नाही लावण्यात आला आहे, तर घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. कारण याची डेडलाईन सरकारकडून वाढवली जाण्याची शक्यता आहे.
याबाबत इकॉनॉमिक टाइम्सने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार आणखी महिनाभर फास्टॅग लावण्याची डेडलाइन वाढू शकते. अनेक वाहनचालक आतापर्यंत रोखीमध्ये टोल देत आहेत. फास्टॅगच्या माध्यमातून सध्या होणारे टोल कलेक्शन 75 ते 78 टक्क्यांच्या दरम्यान आहे. टोलनाक्यांवरील रोखीचे व्यवहार बंद करण्यासाठी सरकारने फास्टॅगसाठी वेगळी लाइन देखील बनवली आहे. एखादी व्यक्ती अशावेळी फास्टॅगच्या रांगेत आला तर त्याला नेहमीच्या टोलपेक्षा दुप्पट पेमेंट करावे लागते.
महत्वाच्या बातम्या
- खुशखबर ! ‘थर्टी फर्स्ट’च्या सोयीसाठी मुंबई महापालिकेचा महत्वाचा निर्णय
- महेबूब शेख यांना नाहक बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र – राष्ट्रवादी
- विरोधी पक्षाने फक्त तंबूत बसून निदर्शने करावीत; शेतकरी नेत्यांची टीका
- तृतीयपंथीयांच्या मनाचा मोठेपणा; साईबाबांच्या झोळीत टाकले 11 लाखांचे दान
- ‘हा’ खुल्यावर्गावर अन्याय; अनेकदा अपयशी झालेले अधिकारी प्रशासन कसं हाताळणार? आनंद दवेंची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
