🕒 1 min read
मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्यात खळबळ उडवून दिली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रामुळे पोलीस दल आणि राजकारणातील भ्रष्टाचार समोर आला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि इतर अधिकाऱ्यांना मुंबईतील बार व हॉटेल्समधून ५० कोटी ते ६० कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले. त्यातून दरमहा एकूण १०० कोटी रुपये जमा करावेत असा आरोप परमबीर सिंग यांनी पत्रातून केला आहे. याकरिता ते सीबीआयच्या दारातही गेलेत.
दरम्यान, यामुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच आमिर खानच्या सत्यमेव जयते कार्यक्रमातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात आयपीएस अधिकारी संजय पांडे बोलत आहेत. यावेळी त्यांनी पोलीस दलातील लाच यावर भाष्य केलेय. त्यांचे संभाषण पुढीलप्रमाणे आहे.
#SanjayRaut This is what a Maharashtra Police's IPS Officer 'Sanjay Pandey' had once said about 'Maharashtra Police-Politicians' Vasooli Chain System' on the show pic.twitter.com/OmJJL47w5r
— Harish Purohit (@Harishp1983) March 22, 2021
आमिर खान-पोलिस अधिकारी, कॉन्स्टेबल हे सामान्य माणूस, ऑटोरिक्षा चालक इत्यादींकडून लाच घेताना आपण बऱ्याच वेळा पाहतो. आपण म्हणतो की त्यांचा पगार खूप कमी आहे, पण आमच्यासारख्या सामान्य माणसांकडून जमा केलेली रक्कम फारच मोठी असते याचा अर्थ त्याचा कमाई चांगलीच होत असावी.
आयपीएस संजय पांडे-जर हे वसूल केलेले पैसे कुणा एका व्यक्तीकडे राहिले असते, तर मी या गोष्टी वर सहमत आहे. गोळा केलेली संपूर्ण रक्कम तो घरी घेऊन जात असेल यावर मला विश्वास नाही.
आमिर खान-केलेल्या पैशांचे काय होते, ते कुठे जातात?
आयपीएस पांडे -आपण सर्व लोकशाहीमध्ये राहात आहोत. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की वरिष्ठांची क्रमवारी असते. मग त्यावर आपले राजकारणी येतात. ही एक साखळी आहे आणि या साखळीत…
आमिर खान -तुम्हाला असे म्हणायचे आहे का की या पैशाचे वाटप होते.
आयपीएस पांडे -होय. मी हे अजून व्यवस्थितपणे समजावून सांगतो. सामान्य माणसांच्या मते भ्रष्टाचाराचे दोन प्रकार आहेत. एक आहे असंघटित प्रकार. उदाहरणार्थ, रस्त्यावर, तुम्हाला तुमचा परवाना मागितला जातो. परंतु तुमच्याकडे तो नसल्यामुळे तुम्ही काहीतरी तडजोड करता. म्हणून हे थोडेसे असंघटित आहे. पोलिसांना हे माहित नाही की ते किती लोकांना पकडतील, त्यांच्याकडून किती रक्कम मिळेल, या गोष्टी बदलत असतात. त्या असंघटित असतात. त्यानंतर बर्याच गोष्टी अशा आहेत की ज्या संघटितपणे केल्या जातात. उदाहरणार्थ आमच्याकडे रेस्टॉरंट्स, एफएल -३ परवाने, दारूची दुकाने, बार आहेत. महाराष्ट्रात मिनी डान्स बार आहेत. त्यांच्यावर बंदी आहे पण अजूनही काही ठिकाणी ती सुरू आहेत. ही झाली संघटित सेटलमेंट, संस्थात्मक वसूली. प्रमुख वितरण… याचा अंदाज जवळजवळ प्रत्येकाला असतो.
आमीर खान-म्हणजे काही ठरावीक रक्कम अपेक्षित असतेच काय?
आयपीएस पांडे-हो ती तर अपेक्षितच असतेच.
आमिर खान आणि पांडे यांचे संभाषण ऐकूण असे वाटते की, पोलीस दलातील भ्रष्टाचार खूप वर्षांपासून सुरू आहे. आणि राजकीय नेते, सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्तानेच तो गैरव्यवहार होत असावा.
महत्वाच्या बातम्या
- स्वतःला वाघ म्हणवणारे ठाकरे आता पवारांच्या ताटाखालचं मांजर झालेत – भाजप
- सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकणार; अमित शहांची बंगालमध्ये घोषणा
- बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी महिना अखेरीस तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद
- इंग्रजी शिकविण्याच्या मुद्द्यावरून शशी शरूर यांचा पारा चढला
- धनंजय मुंडे यांच्या इशार्यानंतर प्रशासन लागले कामाला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

