मुंबई : आज अभिनेत्री कंगना राणावतच्या मुंबईतील कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून तोडक कारवाईची सुरुवात झाली आहे. कंगना आता मुंबई पालिकेच्या रडारवर आहे. कंगनाच्या मुंबईतील वांद्रे याठिकाणी असणाऱ्या कार्यालयामधील तळमजल्यावर पालिकेच्या तोडकामास सुरुवात झाली आहे. पालिकेची टीम कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर दाखल झाली आहे. याठिकाणी असलेल्या कार्यालयामध्ये बेकायदेशीर बदल झाल्याचा आरोप पालिकेकडून करण्यात आला होता. बेकायदेशील बदलांसाठी पालिकेने मंगळवारी नोटीस देखील बजावली होती. नोटीशीला 24 तास उलटल्यानंतर पालिकेकडून तोडक कारवाई होत आहे. म्हणजेच याठिकाणी जे कोणते अनधिकृत बांधकाम आहे, त्याच्यावर पालिकेचा हातोडा पडत आहे. नोटीस आल्यानंतर 24 तासात कशी काय कारवाई केली जाते? हे कुणाच्या दबावाखाली केल जात आहे? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
कालच्या विधानसभेतील हक्कभंगाच्या गदारोळानंतर आज मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगणा राणावतच्या जुहुतील कार्यालयावर हातोडा चालवला. मागील काही दिवसांंपासून कंगणा आणि शिवसेनेतील शाब्दिक युद्ध ईथे थांबेल असं सध्यातरी वाटत नाही. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने ही कारवाई पुर्ण सुडबुद्धीनेच केलेली आहे कारण, जे बांधकाम आज पाडण्यात आलं ते त्यांना आधी का नाही सुचलं? कंगणासोबतचा वाद टोकाला पोहचल्यानंतर ही कारवाई झाली आहे आणि मुंबई महापालिकेने ही कारवाई नियमात राहुन केली आहे का? की कंगणाचं कार्यालय तोडण्यासाठी महापालिकेवर कुणाचा दबाव आहे? रंगलेलं वाकयूद्धाला एक मर्यादा असतात, पण आता कंगणाचे कार्यालय तोडल्याने शिवसेनेने कंगणावर सूड उगवला आहे. आतापर्यंत कंगणाशी अंतर ठेऊन राहीलेल्या भाजपनेही यात आता उघडपणे कंगणाची बाजू घेण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी “आम्ही कंगणासोबत आहोत” असं म्हटलंय याचा अर्थ असा आहे की या प्रकरणात आता कंगणाला भाजपकडून न्यायालयलीन लढ्याला पाठिंबा मिळू शकतो. जेव्हा पासून कंगणा राणावतचा मुद्दा समोर आला आहे तेव्हा पासून शिवसेना बॅकफूटवर गेली आहे म्हणून शिवसेना नेहमी अस्मितेचे मुद्दे पुढे करत आहे. ज्यामुळे महाराष्ट्राची जनता नाराज होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कंगना रणौतच्या कार्यालयावर बीएमसीकडून करण्यात आलेली कारवाई ही राजकीय सुडबुद्धीने केलेली आहे का? असा प्रश्न विचारला असता, शरद पवार यांनी “याबाबत अधिक माहिती नाही. पण सध्याची परिस्थिती बघता वेळ चुकली, तसेच अनधिकृत बांधकाम हा विषय मुंबईसाठी नवा नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावरून शिवसेनेने ही कारवाई किती आताताईपणाने केला हे लक्षात येते.
संपूर्ण मुंबईत केवळ कंगनानेच अनधिकृत बांधकाम केले आहे का? मुंबईतील बाकी सर्व बांधकामे अत्यंत अधिकृत व कायदेशीर आहेत का? मुंबईतील सर्व झोपडपट्ट्या, स्टाॅल्स, व्यापारी व उद्योजकांची कार्यालये, बिल्डर्सची बांधकामे, रस्ते व फुटपाथवर केलेली बांधकामे, शिवसेनेच्या शाखा या सर्व गोष्टी अधिकृतच आहेत का? खैरनार यांच्या स्टाइलमध्ये कंगनाने केलेल्या बांधकामांवर आज रास्तपणे हातोडा चालवण्यात आला. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ही सर्व कारवाई सुडबुद्धीने नाही तर कशाने होत आहे?
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लोकांचे रोजगार गेले आहेत, लोकांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. सुशिक्षित तरुण परिक्षांच्या मुद्द्यांवर सरकार नाराज आहे. अशा वेळी जर सत्ताधारी शिवसेना उगाचच नको ते मुद्दे काढून खोडसाळपणा करुन जनतेचं लक्ष विचलित करत असतील तर महाराष्ट्राची जनता त्यांना कधी माफ करणार नाही.
महत्वाच्या बातम्या :
कंगना बद्दल प्रतिक्रिया देऊ नका , मातोश्रीवरून आदेश
कंगना मुंबईत दाखल, विमानतळाबाहेर राडा
कंगनाच्या कार्यालयावरील बीएमसीच्या कारवाईला तूर्तास स्थगिती!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

