मुंबई : अभिनेत्री कंगनावरून राज्यात चांगलेच गदारोळ सुरु असताना अखेर कंगना मुंबईत दाखल झाली आहे. मात्र विमानतळाबाहेर शिवसेना आणि रिपाई कार्यकर्ते आमने सामने पाहायला मिळाले आहे
विमानतळालवर शिवसेनाकडून जोरदार विरोध होत आहे तर रिपाई कंगनाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत आहे. मी मुंबईत येतीये काय करायचं ते करा असे खुले आवाहन कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून केले होते त्यानंतर ती आज मुंबईत दाखल होण्याआधी बीएमसी कडून कंगनाच्या ऑफिसवर कारवाई करण्यात आली होती त्यानंतर अभेनेत्री कोर्टात धाव घेतली आणि हायकोर्टानकडून या कारवाईला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने कंगना वादाच्या भोवऱ्यात अडकली यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना मध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले. मुंबई आल्यावर कंगनाच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे