Share

उद्धव ठाकरे सरकारी रुग्णालयात का दाखल झाले नाहीत?- चंद्रकांत पाटील

Published On: 

कोल्हापूर : राज्यात सतत कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सामने बघायला मिळतात. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या मानेच्या दुखण्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यावरुन आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंवर निशाणा साधत टीका केली आहे.

माध्यमांशी संवाद साधत असतांना पाटील म्हणाले की,’उद्धव ठाकरे यांना सरकारी रुग्णालय का चालत नाही? याचाच अर्थ राज्यातील सरकारी रुग्णालय सुस्थितीत नाहीत हे सिद्ध होत आहे. मला वैयक्तिक टीका करायची नाही, पण फडणवीस यांना करोना झाल्यानंतर ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते’, असेही पाटील म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’राज्यातील सत्तेतले पक्ष पेट्रोल डिझेलचे कर कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत होते. सगळा स्टंट होता. आता केंद्रानं पेट्रोल-डिझेलवरचा अबकारी कर कमी केला. त्यातून पेट्रोल ५ रुपये तर डिझेल १० रुपये प्रतिलिटर स्वस्त झालं. त्यामुळे प्रत्येक राज्यात अजन एकेक रुपया कमी झाला. त्यानंतर ११ राज्यांनी दर कमी केले. त्यात काँग्रेस शासित राज्य देखील आहेत. महाराष्ट्रात हा व्हॅट पेट्रोलवर २४ टक्के आणि डिझेलवर २५ टक्के आहे. त्याशिवाय ९ टक्के अतिरिक्त सेस आहे. आता बाकीच्या राज्यांप्रमाणे तुमचा ५-१० टक्के का कमी करत नाही? कारण हे पैसे तुमचे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. आज राज्यात किमान १००० ठिकाणी आम्ही निदर्शनं करणार आहोत.’

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!