🕒 1 min read
रांची: रांचीच्या मैदानामध्ये झालेला भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand)दरम्यानचा दुसरा टी-२० सामना भारताने सात गडी आणि १६ चेंडू राखून जिंकला. न्यूझीलंडने दिलेले १५४ धावांचे लक्ष्य भारताने १७.२ षटकांत पार करत तीन लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील तिसरा सामना रविवारी कोलकाता येथे होणार आहे. मात्र या सामन्यात ऋषभ पंत (Rishabh Pant)फिल्डींग करताना जर्सीवर चिकटपट्टी लावून मैदानात उतरला. त्याने असं का केलेलं याचं कारण आता सामोर आलं आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेमधील सामन्यात घातलेली जर्सी ही नुकत्याच युएईमध्ये पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमधील होती. या जर्सीवर टी-२० विश्वचषक २०२१ असा लोगो (logo)होता. त्यामुळेच हा लोगो आणि मजकूर झाकण्यासाठी पंतला चिकटपट्टीची मदत घ्यावी लागली. कोणत्याही द्विपक्षीय मालिकेदरम्यान आयसीसीचा (ICC) लोगो असणारी जर्सी खेळाडूंनी परिधान करु नये असा आयसीसीचा नियम आहे. पंत वगळता इतर सर्व भारतीय खेळाडू या मालिकेसाठीची जर्सी घालून मैदानात उतरलेले ज्यावर बायजूजची जाहिरात होती. त्यामुळे पंत फिल्डींग करताना जर्सीवर चिकटपट्टी लावून मैदानात उतरला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान काल रांची येथे झालेल्या सामन्यात के.एल. राहुल (K.L.Rahul)आणि रोहित शर्मा (Rohit Sharma)यांनी सलग पाचव्या लढतीत किमान अर्धशतकी भागीदारी रचत भारताच्या विजयाचा पाया रचला. राहुलने गेल्या पाच सामन्यांतील चौथे, तर रोहितने मालिकेतील पहिले अर्धशतक झळकावले. दरम्यान न्यूझीलंडच्या टिम साऊदीने या दोघांसह सूर्यकुमार यादवला बाद केले. यानंतर मात्र ऋषभ पंतने ६ चेंडूंत नाबाद १२ करत सलग दोन षटकार लगावून भारताला विजय मिळवून दिला.
महत्वाच्या बातम्या:
- सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला- सोनिया गांधी
- ‘एसटीच्या खासगीकरणाचा सध्या विचार नाही, पण याला ‘हा’ एकच पर्याय उपलब्ध’
- ‘नाना पाटोलेंचे मानसिक संतुलन बिघडले’
- पेन्शन पासून वंचित पात्र स्वातंत्र्य सैनिकांना न्याय द्या; सामाजिक संघटनांचे ठाकरे सरकारला साकडे!
- कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने; चंद्रकांत पाटलांची खंत

