Share

‘एसटीच्या खासगीकरणाचा सध्या विचार नाही, पण याला ‘हा’ एकच पर्याय उपलब्ध’

Published On: 

मुंबई : राज्यात एसटी महामंडळाचे विलीनीकरण राज्य शासनामध्ये करा, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहे. सरकारकडून अद्यापही त्यांच्या मागण्या मान्य होत नाही. राज्य सरकारकडून अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

नजीकच्या काळात संपावर तोडगा न निघाल्यास एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परबांनी (Anil Parab) एक मोठं वक्तव्य केलं आहे. खासगीकरणावर कोणतीही चर्चा झालेली नाही, परिवहन मंत्री असे अनिल परब म्हणाले आहेत.

सध्या उपलब्ध पर्यायांपैकी खासगीकरण हा सुद्धा पर्याय आहे. सध्या मात्र कोणतीही चर्चा खासगीकरणावर झालेली नाही. इतर राज्यांमधील परिवहन मंडळाचा अभ्यास करुन निर्णय घेऊ आणि याबाबत अधिकाऱ्यांकडून अहवाल तयार करण्याचं काम सुरु आहे, असं अनिल परब यांनी सांगितलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघण्याऐवजी तिढा वाढणार की काय अशी चर्चा सुरू झालीय. कारण एसटीचं राज्य सरकारच्या सेवेत विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर गेले असताना एसटीचं टप्प्याटप्यानं खासगीकरण करण्याचा विचार सरकारनं सुरु केल्याची माहिती समोर आली होती. उत्पन्नाचा स्त्रोत वाढवण्यावर सरकारचा भर असून तोट्यातल्या महामंडळाचं खासगीकरण करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!