Share

सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला- सोनिया गांधी

Published On: 

🕒 1 min read

नवी-दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(PM Narendra Modi) तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. काल(१९ नोव्हें.) सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. त्यात त्यांनी तीन कायदे मागे घेतल्याची घोषणा केली तसेच देशाची माफीही मागीतली आहे. या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. असं म्हणत त्यांनी देशाची क्षमाही मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली. दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी(Sonia Gandhi) यांनी हा शेतकऱ्यांच्या बलिदानाचा विजय असल्याचे म्हटले आहे.

सोनिया म्हणाल्या की, ‘७०० हून अधिक शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी न्यायाच्या या लढ्यात बलिदान दिले आहे. आज त्यांचे बलिदान सार्थकी लागले आहे. आज सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला आहे. लोकशाहीत कोणताही निर्णय प्रत्येक संबंधितांशी सल्लामसलत करून आणि विरोधकांशी सल्लामसलत करून घ्यावा. मला आशा आहे की मोदी सरकारने भविष्यासाठी काहीतरी धडा शिकला असेल.’ तसेच गांधीवादी आंदोलनाच्या तब्बल १२ महिन्यांनंतर आज देशातील ६२ कोटी अन्नदाते-शेतकरी-शेतमजुरांच्या संघर्षाचा आणि इच्छाशक्तीचा विजय झाला आहे, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, पुढे केंद्र सरकारवर निशाणा साधत सोनिया म्हणाल्या की, ‘आज सत्तेत असलेल्या लोकांनी शेतकऱ्यांविरोधात रचलेलं षडयंत्रही पराभूत झालं आणि हुकूमशाही राज्यकर्त्यांचा अहंकार देखील. आज रोजीरोटी आणि शेतीवर हल्ला करण्याचा कटही फसला. आज तिन्ही काळे शेतीविरोधी कायदे पराभूत झाले आणि अन्नदाता जिंकला.’

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!