Share

शिवसेनेचं ‘शिवसंपर्क अभियान’ चालू शकतं तर मग शिवभक्तांच्या शिवजयंतीवरच निर्बंध का ?

Published On: 

🕒 1 min read

पुणे : एका बाजूला कोरोनाचं सावट राज्यावर पुन्हा घोंगावत असताना राजकीय पक्षांना याचे काही सोयरसुतक आहे कि नाही असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण कोरोना थोडासा कमी झाल्यानंतर राजकीय पक्ष येत्या स्थानिक निवडणूक लक्षात घेता पुन्हा जोमानं तयारीला लागल्याचं दिसून येत आहे.

राज्यात विविध पक्षांकडून पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी विविध यात्रांचं व कार्यक्रमांचं नियोजन केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वात काही दिवसांपूर्वीच राज्यभरात परिवार संवाद यात्रा काढण्यात आली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात गावोगावी कार्यकर्त्यांचे मेळावे देखील घेण्यात आले. यानंतर, आता शिवसेना देखील पक्षबांधणीसाठी सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेची वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली.या बैठकीला शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते, मंत्री, आमदार, खासदार आणि राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख उपस्थित होते. या बैठकीत राज्यभरात शिवसेना ही शिवसंपर्क अभियान राबवणार असल्याचं समोर येत आहे.

गावोगावी शिवसेना पोहोचवण्यासाठी शिवसंपर्क अभियान राबवण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसारच, 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीदरम्यान राज्यभरात शिवसेनेचं ‘शिवसंपर्क’ अभियान राबवलं जाणार असल्याची माहिती सेना नेत्यांनी दिली आहे.

दरम्यान, कोरोनाचे संकट असल्याचे सांगत राज्यात शिवजयंती साठी निर्बंध घातले गेले आहेत.अनेक ठिकाणी याआधीच शिवभक्तांकडून विविध कार्यक्रमांच्या आयोजनाची तयारी करण्यात आली होती मात्र ऐनवेळी गृहविभागानं आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातल्यामुळे शिवभक्तांच्या आनंदावर विरजण पडले. सरकारने शिवजयंतीला फक्त १०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.१०० लोकांच्या उपस्थितीला परवानगगी देण्यात आली असली तरी इतर निर्बंध मात्र राज्य सरकारने कायम ठेवले आहेत.

एका बाजूला हे चित्र असताना दुसरीकडे राजकीय पक्षांचे मेळावे,यात्रा,आंदोलने सर्रासपणे सुरु आहेत.राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेत अनेक ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसून आले आहे.मास्कचा वापर नेते मंडळीच करताना दिसून येत नसल्याने इतर कुणाकडून नियमांचं पालन व्हावं हि अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.

कोरोनाबाबत नियम पाळले जात नसल्याचे सांगत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यांनी सांगत नुकतीच खंत व्यक्त केली.जर नियम पाळले जात नसतील तर पुन्हा लॉकडाऊनकडे जाण्याची शक्यता आहे, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.मात्र त्यांच्याच पक्षाच्या संवाद यात्रेत होत असलेल्या कोरोनाबाबतच्या उल्लंघनाच्या बाबत ते काहीही बोलले नाहीत.आरोग्यमंत्री आपल्याच पक्षाच्या धुमधडाक्यात सुरु असलेल्या या संवाद यात्रेबाबत चकार शब्द देखील काढत नाहीत मात्र सर्वसामान्य लोकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करा असा आग्रह धरतात हे कितपत योग्य आहे असा सवाल या निमित्ताने आता सर्वसमान्य विचारत आहेत.

दरम्यान, आम्ही याबाबत शिवसेनेचे जेष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता मुख्यमंत्र्यांनी त्यांना सर्व कोरोनाचे नियम पाळून हे स्वतःची व इतरांची काळजी घेत अभियान यशस्वी करण्याबाबत सूचना दिल्या असल्याचे सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!