मुंबई : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. मागील आठवड्यात पूजाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर महाविकास आघाडीमधील मंत्री संजय राठोड यांच्या या मुलीशी संबंध असून काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले आहेत.
यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून मंत्र्यांच्या बचावासाठी योग्य कार्यवाही केली जात नसल्याचे आरोप भाजप कडून करण्यात येत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची भेट घेऊन योग्य कारवाई करण्यासाठी निवेदन देऊन कथित कॉल रेकॉर्डिंग्सची देखील चौकशी व्हावी अशी मागणी केली होती.
तर, पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले जात असून गुन्हा दाखल झाला पाहिजे तसेच त्यांच्या राजीम्याची देखील मागणी जोर धरत होती. या आरोपानंतर संजय राठोड यांचं मंत्रिपद अडचणीत सापडलं आहेत, राठोड यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपाने चांगलीच लावून धरली होती. अनिल देशमुख यांनी संजय राठोड यांची नियमांनुसार कारवाई केली जाईल असं सांगितलं होतं.
यामुळे, संजय राठोड यांच्या अडचणी अधिक वाढत असल्याचं दिसून आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. मात्र, अद्याप याला कोणताही दुजोरा मिळालेला नाही. शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. संजय राठोड कुठे आहेत, असा प्रश्न एका खाजगी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने केला असता, ‘संजय राठोड कुठं आहेत याचं उत्तर मी देऊ शकत नाही,’ असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.
यासोबतच, ‘संजय राठोड हे राज्याचे मंत्री आहेत, त्यांच्या सभोवताली वादळ घोंघावत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः याप्रकरणाची दखल घेतली आहे. त्यामुळे पोलीस याबाबत कारवाई करतील. उद्धव ठाकरे हे अतिशय संवेदनशील व हळवे नेते आहेत, त्यामुळे राज्यात कायद्याचचं राज्य आहे. सरकार सत्याच्या मार्गानेच चाललं आहे.’ असं संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या ‘परिवार संवाद यात्रे’नंतर आता शिवसेनेचं ‘शिवसंपर्क’ अभियान !
- देवगिरी कारखाना सुरु होण्याची शक्यता; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन
- शेतीला सुरळीत वीजपुरवठा पाहिजे असेल तर वीजबिल भरावेच लागणार ?
- पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने विरोधकांच्या भूमिकेवर यु-टर्न सारखी शेरेबाजी करणे शोभते का ?
- 15 व्या वर्षात घराबाहेर काढलेल्या कंगनाला नेटकऱ्यांनी केले पुन्हा ट्रोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

