Share

शिवसेना-युवासेनेचा ‘एक हात मदतीचा’ उपक्रम, पूरग्रस्तांची मदत करण्याचे आवाहन

Published On: 

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पुराणे हाहाकार उडाला आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून अनेकांना प्राण गमवावे लागले तर या परिस्थितीमुळे या भागातील नागरिकांची वाताहत झाली आहे. त्यामुळे या भागातील पीडितांना आर्थिक मदत करण्यासाठी सिल्लोड येथे शिवसेना – युवासेनेच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत शहरात मदत फेरी काढून पुरग्रस्थाना मदत करण्याचे अवाहन करण्यात येत आहे.

देशात किंबहुना राज्यात जेव्हा जेव्हा संकटे आली त्यावेळी सिल्लोडहुन पीडितांना मदत करण्याचे काम झाले आहेत. राज्यमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळ, सिल्लोड नगर परिषद, सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती, युवा व्यापारी प्रतिष्ठान, व्यापारी महासंघ अशा विविध संस्था तसेच व्यापारी बांधवांच्या माध्यमातून कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना सिल्लोड हुन ११ लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले असल्याची माहिती यावेळी युवानेते अब्दुल समीर यांनी दिली.

सदरील मदत ही मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार असून आपण रोख किंवा धनादेशाने ही मदत देवू शकतात असे स्पष्ट करीत सर्व स्तरातून पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन याप्रसंगी अब्दुल समीर यांनी केले. या निमित्त व्यापाऱ्यांच्या भेटी घेवून त्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!