🕒 1 min read
औरंगाबाद :गेल्या वीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ज्योतिनगर वाॅर्डात रस्त्याचे काम मार्गी लावल्याचे समाधान वाटते. भाजप सरकारच्या काळात केवळ पाईपलाईन झाल्या मात्र जलकुंभ झाले नव्हते. मात्र शिवसेना सरकारच्या कार्यकाळात जलकुंभ तसेच १६८० कोटींच्या जलवाहिनीचे काम मार्गी लागले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे या शहरावर विशेष प्रेम असल्याचे यावरून सिद्ध होते. मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवारी (दि.२७) सह्याद्री कॉर्नर ते विश्वरूप हॉल दरम्यान असलेल्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटिकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आ. दानवे बोलत होते.
पुढे बोलतांना आमदार दानवे म्हणाले की, मला सर्वात समाधानकारक काम ज्योतीनगर वॉर्डात करता आले. माझ्या एकंदर कामांमधील अत्यंत महत्वाचे काम म्हणजे ज्योती नगर वाॅर्डाचे असल्याचे मी मानतो. कोविड परिस्थिती असतानाही विकासकामे करण्याचा वेग शिवसेनेच्या सरकारने केला आहे. या रस्त्याचे लोकार्पण माझ्या हस्ते झाले याचा मनस्वी आनंद होत असून पुढील वर्षी आणखी १ कोटी रुपयांचा विकास निधी ज्योती नगर वाॅर्डासाठी आणेल असे अभिवचन आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी दिले. ज्योतीनगर येथील रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
विविध विकासकामांसाठी १ कोटी रुपयांचा निधी ज्योती नगर वाॅर्डासाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन आमदार दानवे यांनी दिले. माजी सभागृह नेते गिरजाराम हाळनोर बोलताना म्हणाले की, ज्योती नगर वाॅर्डात निधीअभावी अनेक विकासकामे प्रलंबित होती. त्यामुळे येथील नागरिकांना रस्त्याबरोबरच इतरही मूलभूत सोयी सुविधांअभावी मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी नागरिकांच्या अडचणींची दखल घेऊन भरीव निधी उपलब्ध करून दिला याबद्दल त्यांचे आभार.
महत्त्वाच्या बातम्या
- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची आर्थिक व मानसिक कुचंबणा दूर करा, शिक्षक मंत्र्यांना साकडे!
- शिवसेना-युवासेनेचा ‘एक हात मदतीचा’ उपक्रम, पूरग्रस्तांची मदत करण्याचे आवाहन
- पूर परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाने पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत द्यावी – राज्यपाल
- ‘छोटे व्यवसायी आणि दुकानदारांची हलाखीची स्थिती’ ; फडणवीसांनी लिहले मुख्यमंत्र्यांना पत्र
- चिपळूणच्या नागरिकांना मदतीसाठी नाशिक मनसे कार्यालयाचं वॉर रुममध्ये रुपांतर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
