नाशिक : चिपळूण व खेडमध्ये पुराचं पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे. चिपळूण व खेडला मदतीसाठी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना पुढाकार घेत आहेत. पूरग्रस्त आणि दरडग्रस्त भागाला मदत करण्यासाठी मनसेनं देखील पुढाकार घेतला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणाहून मदत पाठवायला सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्यातील मनसे देखील मदतकार्यासाठी सक्रिय झाली आहे. मनसेच्या वतीनं चिपळूणवासियांसाठी मदत पाठवण्याचं काम सुरु आहे.
यासाठी त्यांनी नाशिक मनसे कार्यालयाचं वॉर रुममध्ये रुपांतर केले आहे. त्यांनी अनेक जीवनावश्यक वस्तू. वैध्याकीय सेवा इत्यादीची व्यवस्था केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मदत करा, असा आदेश दिला आणि मनसे मैदानात उतरली आहे.
प्रत्येक राजकीय पक्ष आप-आपल्या परिने कोकणच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. यात मनसेही मागे नाही. या माध्यमातून जास्तीत जास्त मदत पुरग्रस्त भागाला करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेेचे कार्यकर्ते करण्याचा प्रयत्न करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोल्हापूर सांगलीमध्ये अलमट्टी धरणामुळे पूर नाही, तर…’ ; अजित पवारांनी सांगितलं ‘हे’ कारण
- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान दुर्दैवी
- आसाम मिझोराम सीमावादातून हिंसाचार, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू
- ‘पूरग्रस्त कुटुंबाला १५ हजार, घरांच्या नुकसानीसाठी ५० हजार तर व्यापारी-विक्रेत्यांना नुकसानीच्या २५ टक्के रक्कम द्या’
- ‘मुंबई इंडियन्स ते कसोटी संघात स्थान’ अवघ्या पाच महिन्यात बदलली सुर्याचे कारकिर्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

